चंद्रशेखर आझाद, रावण यांच्यावर प्राणघातक हल्ला… हल्लेखोर पसार

भीम आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष ‘चंद्रशेखर आझाद रावण’ यांच्यावर उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला आहे. देवबंद या ठिकाणी ते कारने जात होते. तेव्हा काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. या गोळीबारात चंद्रशेखर आझाद जखमी झाले आहेत. एक गोळी कारच्या दरवाजातून आरपार जाऊन आझाद जखमी झाले आहेत. हल्ला करून हल्लेखोर तिथून पसार झाले असून आझाद यांना ताबडतोब देवबंद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चंद्रशेखर त्यांच्या फॉर्च्यूनर कारने देवबंद दौऱ्यावर निघाले होते. ते ड्रायव्हरच्या बाजूला फ्रंटसीटवर बसले होते. देवबंदजवळ पोहोचले तेव्हा अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान गोळी त्यांच्या बरगडीला चाटून गेली असून यामध्ये ते थोडक्यात बचावले आहे. त्यांच्या कारवर अनेक गोळ्यांचे ठसे दिसत असून कारच्या सगळ्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे.
गोळीबाराच्या या घटनेनंतर भीम आर्मीने संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तातडीने अटक करावी आणि चंद्रशेखर आझाद रावण यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे. आरएलडीचे स्थानिक आमदार मदन यांनी सांगितले की, सध्या रावण यांची प्रकृती स्थिर असून कोणाताही धोका नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
#WATCH | "I don't remember well but my people identified them. Their car went towards Saharanpur. We took a U-Turn. Five of us, including my younger brother, were in the car when the incident occurred..," says Bhim Army leader and Aazad Samaj Party – Kanshi Ram chief, Chandra… pic.twitter.com/MLeVR8poaN
— ANI (@ANI) June 28, 2023
चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले की, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण होती. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्या सोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यु-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो.
दरम्यान या घटनेबाबत बोलताना एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी म्हणाले की, चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हे हल्लेखोर कारमधून आले होते. हल्लेखोरांची एक गोळी आझाद यांच्या कमेरजवळून गेली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, हल्लेखोरांनी वापरलेल्या कारवर हरयाणा राज्याची नंबर प्लेट असल्याची माहिती समोर आली आहे.
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055