Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मणिपूर हिंसाचार : पोलीस आणि सुरक्षादल अॅक्शन मोडमध्ये , दहशतवाद्यांनी बांधलेले 12 बंकर नष्ट , दंगेखोरांची धरपकड …

Spread the love

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये मागच्या दोन महिन्यंपासून हिंसाचार सुरू आहे. आता पोलीस आणि सुरक्षादल अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मागच्या 24 तासात मणिपूरमध्ये मोठी कारवाई झाली आहे. दहशतवाद्यांनी बांधलेले 12 बंकर सुरक्षा दलांनी नष्ट केले आहेत. तसंच 135 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मणिपूर पोलिसांनी याबाबतचं निवेदन जारी केलं आहे.

राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी तामेंगलाँग, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, कांगपोकपी, चुराचंदपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवली. या कारवाईत दहशतवाद्याचे 12 बंकर उद्ध्वस्त केले आहेत. सुरक्षादलांच्या या शोध मोहिमेत साहुमफाई गावातील एका भातशेतीत पोलिसांना तीन 51 मिमी मोर्टार शेल, तीन 84 मिमी मोर्टार आणि आयईडी देखील पोलिसांना आढळला. बॉम्बनाशक पथकाने हा आयईडी नष्ट केला आहे. आतापर्यंत एकूण 1,100 शस्त्रं, 13, 702 दारूगोळा आणि विविध प्रकारचे 250 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सध्या मणिपूरमध्ये नेमकी काय स्थिती?

मणिपूर मध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. मणिपूरमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सामान्य आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोन महिने झाले मणिपूर धगधगतं आहे. हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. या हिंसाचारात आतापर्यंत 120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3 हजारपेक्षा अधिक लोक जखमी आहेत. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती पाहता पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. कोणतीही अफवा आढळल्यास नियंत्रण कक्षाला कळवावं, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 9233522822 या क्रमांकावर फोन करून माहिती कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

जर काही शस्त्रं, दारूगोळा आणि स्फोटकं असल्यास पोलीस आणि सुरक्षा दलांकडे जमा करण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत. मणिपूरमधील संवेदनशील भागात पोलिसांकडून अधिकची काळजी घेतली जाते. मणिपूरमधली परिस्थिती पाहता मोठा बंदोबस्त मणिपूरमध्ये तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र बलाच्या 84 तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर आसाम रायफल्सचेही 10 हजारांहून अधिक जवान मणिपूरमध्ये तैनात आहेत.

पंतप्रधान मोदी यांना दिली माहिती

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर सरकार आणि केंद्राने संकटग्रस्त राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. अमेरिका आणि इजिप्तचा पाच दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी आज पहाटे भारतात परतले. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी अमित शहा यांची त्यांच्या दिल्लीतील घरी भेट घेतल्यानंतर आणि मणिपूरमधील “उत्क्रांत होत असलेल्या परिस्थिती” विषयी अहवाल सादर केल्यानंतर एक दिवसानंतर ही माहिती देण्यात आली. त्यांनी शाह यांना सांगितले की राज्य आणि केंद्र सरकार हिंसाचारावर “मोठ्या प्रमाणात” नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहेत. त्यावर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

कालबद्ध कृती आराखड्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, “सर्व भागधारक, नागरी संस्था, आमदार आणि राजकीय नेत्यांनी एकत्र बसण्याची आणि सर्वांनी काम करणे आवश्यक असलेली क्षेत्रे ओळखण्याची वेळ आली आहे.” शाह यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचेही आयोजनही केले, ज्यामध्ये 18 राजकीय पक्ष उपस्थित होते. बैठकीत, पक्षाच्या प्रतिनिधींनी आग्रह धरला की केंद्राने राज्यात शांतता पुनर्संचयित करण्यासाठी “कालबद्ध कृती आराखडा” ठेवला आहे.

परिस्थिती पूर्वपदावर, गृहमंत्र्यांच्या दावा …

गृहमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान पहिल्या दिवसापासून हिंसाचारग्रस्त राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि अधिकाऱ्यांना “संपूर्ण संवेदनशीलतेने” मार्गदर्शन करत आहेत. अधिकार्‍यांनी पक्षाच्या प्रतिनिधींना 3 मे रोजी राज्यात सुमारे 36,000 सुरक्षा कर्मचार्‍यांना तैनात करून 3 मे रोजी राज्यात हिंसाचाराच्या पहिल्या घटनेपासून केलेल्या प्रयत्नांचे तपशीलवार चित्र दिले. मणिपूरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की सुरक्षा दल मानवतावादी ऑपरेशन्स आणि क्षेत्र-वर्चस्व गस्त यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

 

कारण राजकारण : ममता बॅनर्जी आणि मायावती विरोधकांच्या एकजुटीत रस का दाखवत नाहीत?

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!