PMNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार !!

कैरो : इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने सन्मानित केले. हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी हेलिओपोलिस वॉर मेमोरियल आणि अल हकीम मशिदीला भेट दिली. पंतप्रधानांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. या दौऱ्यावेळी या दौऱ्यादरम्यान इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला.
इजिप्तमध्ये शनिवारी मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. इजिप्त दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी(आज) पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध ‘अल हकीम’मशिदीला भेट दिली. यावेळी दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांनी पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.
#WATCH | Egyptian President Abdel Fattah al-Sisi confers PM Narendra Modi with 'Order of the Nile' award, in Cairo
'Order of the Nile', is Egypt's highest state honour. pic.twitter.com/e59XtoZuUq
— ANI (@ANI) June 25, 2023
गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा १३ वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय इजिप्त दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची कैरो येथे भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi visits Al-Hakim Mosque in Cairo, Egypt pic.twitter.com/lziLcHrXVz
— ANI (@ANI) June 25, 2023
शहिदांना वाहिली श्रद्धांजली
यानंतर पंतप्रधान मोदींनी हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह येथील युद्ध स्मारकाला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये शहीद झालेल्या 4000 भारतीय सैनिकांचे स्मारक म्हणून हे स्मारक ओळखले जाते. 11व्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीचा भारताशीही विशेष संबंध आहे. भारताने या मशिदीच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या या मशिदीचे नूतनीकरण बोहरा समाजाने केले. दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे धर्मगुरू सय्यद मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी त्याची जबाबदारी घेतली. बुरहानुद्दीन यांचे भारताशी संबंध असून त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बोहरा समाजाचे सदस्य पंतप्रधानांच्या भेटीने खूश
दरम्यान भारतीय वंशाच्या बोहरा समुदायाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अल-हकीम मशिदीत येथे आले आणि आम्हाला भेटले. त्यांनी आमच्या बोहरा समाजाचीही विचारपूस केली आणि आमच्याशी संवादही साधला. ते आमच्या कुटुंबातील सहस्य आहेत, असे आम्हाला वाटले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.