MedicineNewsUpdate : सावधान : आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या १४ फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी

नवी दिल्ली : डीजीसीआय म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाच्या अहवालावरून केंद्र सरकारने आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या १४ औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने हा नवा निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार भारत सरकारने १४ प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर ही बंदी घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने आता १४ प्रकारच्या एफडीसी कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.
डीजीसीआय च्या तज्ज्ञ समितीने आधी १४ प्रकारची एफडीसी कॉम्बिनेशन असणारी औषध मानवी आरोग्यासाठी घातक असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. डीसीजीआयने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल उचलत या औषधांवर बंदी घातली आहे.
फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषध म्हणजे काय?
दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन होय. यामध्ये Nimesulide + Paracetamol dispersible गोळ्या आणि Pholcodine + Promethazine या सारख्या घटकांचा समावेश आहे. या शिवाय केंद्र सरकारने शुक्रवारी १४ फिक्स्ड-डोज कॉम्बिनेशन औषधांवर उपचारात्मक स्पष्टता नसल्याच्या कारणावरुन बंदी घातली आहे. फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन ही अशी औषधे, ज्यामध्ये एका गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र असतात. यानांच ‘कॉकटेल’ औषधे असेही म्हटले जाते.
या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी
केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ”तज्ज्ञ समितीने या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या औषधांच्या उपचारात्मकतेबाबत स्षटता नाही आणि यामुळे मानवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या १४ एफडीसी औषधांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे”. असे सांगितले आहे. तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे .