Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“पंतप्रधान मोदी अनेक बाबतींत अकार्यक्षम,” अर्थ तज्ज्ञ डॉ . प्रभाकर यांचा दावा

Spread the love

पंतप्रधान मोदी अनेक बाबतींत अकार्यक्षम,” अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांच्या पुस्तकात मोदी सरकारवर आसूड 

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ, लेखक डॉ. परकला प्रभाकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करणारे नवे पुस्तक लिहिले आहे. डॉ. परकला प्रभाकर यांच्या “The Crooked Timber Of New India : Essays on a Republic in Crisis” या चौथ्या पुस्तकात मोदी सरकारच्या काळातील अनेक घटनांवर बोट ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत अकार्यक्षम कारभार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त अर्थव्यवस्थेमध्येच नाही तर इतरही अनेक आघाड्यांवर अकार्यक्षम ठरले असल्याचा खळबळजनक दावा डॉ. परकला प्रभाकर यांनी आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी ‘द वायर’ या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनेलवर डॉ. परकला प्रभाकर यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये डॉ. प्रभाकर यांनी पुस्तकातील खळबळजनक दाव्याबाबत आपली स्पष्ट आणि सडेतोड मते व्यक्त केली. “पंतप्रधान मोदी अनेक बाबतींत अकार्यक्षम असले तरी काही बाबतीत ते कार्यक्षम आहेत. समाजात फूट पाडणे, जातीय विद्वेष निर्माण होईल, असे वातावरण तयार करणे याबाबत ते कार्यक्षम ठरल्याचे देशातील घटनांवरून दिसते,” असा खळबळजनक दावा डॉ. प्रभाकर यांनी केला.

पत्रकार करण थापर यांनी, हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारला. त्यावर डॉ. प्रभाकर म्हणाले की, देशात चाललेल्या चुकीच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. आपला देश सध्या चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. प्रजासत्ताक भारताने जी तत्त्वे आणि मूल्ये आखून दिली होती, त्यांपासून आपण दूर चाललो आहोत. देशात सध्या जे काही चालू आहे, त्यावरून मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. तुम्ही टीका का करत आहात? तुम्हाला काहीच चांगले दिसत नाही का? मग आपल्याकडे पर्याय काय आहेत? असे प्रश्न मला विचारण्यात येतात. मी त्या सर्वांना सांगतो की, पर्याय काय असेल हे लोक ठरवतील. मी आणि तुम्ही नाही. मी फक्त देशात काय चुकीचे सुरू आहे ते लोकांसमोर मांडू इच्छितो आहे.

“भाजपाची १९८० साली जेव्हा स्थापना झाली, तेव्हा त्यांनी गांधींचे विचार आणि समाजवादाला विरोध केला होता. १९९१ साली नव्या आर्थिक सुधारणांनाही त्यांनी विरोध केला, जे फार गंभीर होते. आज मोदी सरकारला कोणते अर्थतज्ज्ञ सल्ला देत आहेत, याची मला कल्पना नाही. कोणत्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला ऐकून त्यांनी निश्चलनीकरणासारखा आपत्तिजनक आणि अव्यवहार्य निर्णय घेतला, हे कळले नाही. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पण तुम्ही कोणत्याही अर्थतज्ज्ञाला विचारा, काळा पैसा हा रोखीमध्ये असतो का?” असा प्रश्न डॉ. प्रभाकर यांनी या मुलाखतीदरम्यान उपस्थित केला.

अरुण जेटली, निर्मला सीतारमन अकार्यक्षम आहेत का?
मोदी यांच्या पंतप्रधानकाळात आधी अरुण जेटली अर्थमंत्री होते, त्यानंतर निर्मला सीतारमन अर्थमंत्री झाल्या. हे दोन्ही नेते अर्थमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेत का? असाही प्रश्न पत्रकार करण थापर यांनी विचारला असता, डॉ. प्रभाकर म्हणाले की, मी कुणाही एका व्यक्तीकडे अंगुलिनिर्देश करणार नाही. हा विषय कुणाही एका व्यक्तीबद्दलचा नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरेन, कारण ते या सरकारचे प्रमुख आहे. देशात चाललेल्या बऱ्या-वाईट घटनांना ते थेट जबाबदार आहेत.

आंबेडकरी चळवळीतील नेते मनोज संसारे यांचे निधन

 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!