Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraLive : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल पाहता येईल लाईव्ह , राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे चुकीचे

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या निकाल देत आहे . दरम्यान, महाराष्ट्रात या वृत्तामुळे चांगलीच राजकीय खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे राज्याची राजकीय दिशा ठरणार असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही गट त्यांच्या बाजूने निर्णय झाल्याचा दावा करत आहेत. उद्या कोर्टातून या निकालाचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. म्हणजेच जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे.


11.May.23

 • भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर, अधिकृत व्हिप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

 

 • अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत, हा बचाव होऊ शकत नाही

 

 • सरकारवर शंका घेण्याचे कारण राज्यपालांकडे नव्हते. बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर नको

 

 • उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता.

 

 • ठाकरेंच्या बाजूने काय काय?

  – प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य

  – गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर

  – फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही

 

 • सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंच्या बाजूने, तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे, अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश

 

 • राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे चुकीचे होते, मात्र, नंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने तेव्हाची स्थिती आता निर्माण केली जाऊ शकत नाही, त्यामुळे नंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पाचारण करणे योग्य व न्याय्य होते – सुप्रीम कोर्ट

 

 • मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेणं चुकीचे, राजीनामा घेतला नसता तर सरकार परत आणले असते – सुप्रीम कोर्ट

 

 • नबाम रेबिया प्रकरणाचा विषय मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्यात येत आहे – सुप्रीम कोर्टाचा निर्णय

 

 • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याप्रमाणे नव्हता – सुप्रीम कोर्ट

 

 • तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घटनापीठाचे ताशेरे, कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही, घटनापीठाचे गंभीर निरीक्षण

 

 • महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वासाचा प्रस्तावही दिला नव्हता, उद्धव ठाकरे सरकारने विश्वास गमावला आहे की नाही, हे राज्यपालांनी आधी तपासायला हवे होते – सुप्रीम कोर्ट

 

 • राज्यपालांपुढे बहुमत चाचणी बोलावण्यासारखी वस्तुनिष्ठ स्थिती नव्हती : सुप्रीम कोर्ट

 

 • शिवसेनेत दोन गट पडलेले असताना आणि दोन व्हिप असताना विधानसभाध्यक्षांनी चौकशी करणे गरजेचे होते, पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कोण व्हिप आहे, हे विधानसभाध्यक्षांनी तपासायला हवे होते, घटनापीठाचे महत्त्वाचे निरीक्षण

 

 • एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भरत गोगावले यांना व्हिप म्हणून विधानसभाध्यक्षांनी मान्यता देणे बेकायदेशीर – सुप्रीम कोर्टाचा निर्णय

 

 • महाराष्ट्राच्या निमित्ताने नबाम रेबिया प्रकरणाचा विषय आणखी मोठ्या पीठाकडे जाणार. घटनापीठाचा निर्णय…

 

 • नबाम रेबियाचं प्रकरण मोठ्या बेंचकडे जाणार

 

 • दिल्लीच्या प्रकरणात केंद्र सरकारला झटका, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 

 • दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणाचा निकाल बहुमताने असल्याचे नमूद करत सरन्यायाधीश चंद्रचूड मुख्य निकालाचे वाचन करत आहेत.

 

 • घटनापीठामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर.शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांचा समावेश.

 

 • महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सामना कार्यालय आणि शिवसेना भवनाबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली

 

 • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार

 

 • थोड्याच वेळात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ न्यायालयासनावर स्थानापन्न होतील…. त्यानंतर प्रथम दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणाचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होईल…

 

 • महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानच्या निकालाचे वाचन साडेअकरा नंतर होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात उत्सुकता

 

 • सर्वोच्च न्यायालय मी घेतलेल्या निर्णयाला धरूनच निकाल देईल: नरहरी झिरवळ

 

 • सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश एकत्र जमणार, माजी सरन्यायाधीश ए.एम. अहमदी यांना श्रद्धांजली वाहिली जाणार. त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुनावला जाणार.

 

 • मी ज्या दिवशी निर्णय घेतलाय, तो घटना कायदा कानून तपासून घेतलाय. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार: नरहरी झिरवळ

 

 • सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, १६ आमदार अपात्र ठरल्यास उर्वरित २४ आमदारही अपात्र ठरतील, शिंदे गट संपेल: संजय राऊत

 

 • सत्तासंघर्षाच्या निकालाला अवघे काही तास, शिंदे गटातील तो मंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; खैरेंचा दावा

 

 • नाशिक: १४५ आमदारांचं पाठबळ असेपर्यंत सरकार स्थिर, अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जाऊ शकतो: अजित पवार

 

 • शिंदे गटाचे १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

 

 • महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उरलेसुरले आमदारही ठाकरेंसोबत राहणार नाहीत: उदय सामंत

 

 • महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या दिवशी जयंत पाटील यांना नोटीस आली असेल तर तो योगायोग: उदय सामंत

 

 • नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी शिंदे गटाचे आमदार राहुल शेवाळे दिल्लीत दाखल

 

 • महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, सोमवारी चौकशीला बोलावले

 

 • महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल, गृह विभागाकडून पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना. निकालानंतर वाद उफाळण्याची शक्यता, पोलिसांकंडून खबरदारी

 

 • विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असल्याची चर्चा, सत्तासंघर्षाच्या निकालाला उरले अवघे काही तास

 

 • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा या पाच जणांचे घटनापीठ देणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल.

 

 • महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. १९७३ सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे.

 

 • सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सत्ताबदल झाला असेल घड्याळाचे काटे उलटे फिरवून राज्यपालांचा निर्णय रद्द करता येईल का?

 

 • विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास नोटीस बजावली असेल तर त्यांना कारवाईचे अधिकार आहेत का? त्यांचे अधिकार कधीपासून खंडित होतात? सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

 

 • शिवसेनेमध्ये फूट पडली की नाही? पक्षांतर बंदी कायद्याच उल्लंघन झाले का, हे आजच्या निकालाने स्पष्ट होईल. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर शिंदे सरकारला पायउतार व्हावे लागेल.

 

 • शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाचा आज होणार फैसला; ऐतिहासिक निकालाकडे अवघ्या देशाचे डोळे

 

 • धाकधूक वाढली; ज्या १६ आमदारांच्या भविष्याचा फैसला होणार, त्यांची राजकीय कारकीर्द एका क्लिकवर

 

 • एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येणार. १६ आमदार अपात्र ठरल्यास राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता.

 

 • सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निकालाचे वाचन करतील. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने अंतिम निकालावर शिक्कामोर्तब केले आहे.

 

 • सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर ठाकरे आणि शिंदे गटाची भविष्यातील राजकीय वाटचाल अवलंबून असेल.

 

 • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ यावरील ऐतिहासिक आणि दूरगामी निकाल देणार आहे.

 

 • शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतर गेले १० महिने सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निर्णय आज, गुरुवारी देण्यात येणार आहे.

10.May.23

दरम्यान हा देश संविधानावर चालतो की नाही हे उद्या ठरेल, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही जिवंत आहे की नाही? आपली न्यायव्यवस्था कोणाच्या दबावाखाली काम करत आहे की नाही, हेही उद्या ठरवले जाईल. हा देश संविधानाने चालतो आणि जो देश राज्यघटनेने चालत नाही तो पाकिस्तानची अवस्था बघा. हा देश संविधानाने चालवावा, आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र राहावी, असेही ते म्हणाले.

निकाल काहीही लागो राज्य सरकारकडे बहुमत आहे : राहुल नार्वेकर

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, सध्याच्या राज्य सरकारकडे बहुमत आहे, निर्णय काहीही असो. मी सभापती झाल्यानंतर बहुमत चाचणीत हे सरकार यशस्वी ठरले. आकड्यांचा विचार केला तर कोणताही निर्णय आला तरी या सरकारकडे बहुमत आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा सभापतींचा विशेषाधिकार असल्याचे नार्वेकर यांनी मंगळवारी सांगितले होते. नार्वेकर हे प्रशिक्षित वकीलही आहेत. न्यायपालिकेला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची चांगली जाणीव आहे, असेही ते म्हणाले.

न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास : आदित्य ठाकरे

तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संविधानाचे पालन केल्यासच देशाचा फायदा होईल. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, मला कळले आहे की, 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. उद्या सर्व काही स्पष्ट होईल, मीही 16 आमदारांपैकी एक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने येईल, असे मला वाटते. त्याची आम्हाला चिंता नाही.

“बहुमत सिद्ध करू शकतो”

288 सदस्यीय विधानसभेत गरज पडल्यास सत्ताधारी शिवसेना-भाजप युती 184 पेक्षा जास्त मते मिळवून बहुमत सिद्ध करू शकते, असा दावा महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वी टिप्पणी करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

बंडानंतर नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेच्या अनेक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. 19 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांच्या बंडखोरीनंतर त्यांचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि 30 जून रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे यांनी शिवसेनेच्या ५६ पैकी ४० आमदारांना सोबत घेतले. मात्र, शिंदे कॅम्पमध्ये गेलेल्या एकूण बंडखोर आमदारांपैकी केवळ 16 आमदारांनाच अपात्रतेच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना मानली.

याचे कारण म्हणजे शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा त्यांच्यासोबत 11 आमदार होते, ते आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले होते. एक दिवस उलटूनही हे १२ आमदार उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे सुरुवातीला ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका दाखल केली होती. नंतर त्यांनी आणखी चार आमदारांना नोटिसा पाठवल्याने त्यांची संख्या १६ झाली. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून घोषित केले आहे, हेही नमूद करायला हवे.

 

MaharshtraPoliticalUpdate : ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर वर्तविल्या दोन शक्यता ..

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

आपलं सरकार

Click to listen highlighted text!