नितीन गडकरींना दाऊद इब्राहिमच्या नावे, जीवे मारण्याची धमकी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपुर येथील त्यांच्या कार्यलायत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे धमकीचा फोन करून नितीन गडकरींना धमकी देण्यात आली असून, खंडणी मागण्यात आली आहे. माहिती मिळताच अर्ध्यातासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयास पोलिसांनी वेढा घातला. तसेच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
नितीन गडकरी यांच्या खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता फोन आला. फोनवरून बोलणा-या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह एटीएस, एएनओसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गडकरी यांच्या वर्धारोडवरील निवासस्थानावर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकहा सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.
भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#gallitedili #CurrentNewsUpdate #MahanayakNews #MahanayakOnline #Maharashtranews #NewsUpdates #Highlights #NitinGadkari