FIFA World Cup Latest Update : मेस्सी खुश हुवा …… , अर्जेटिनाने मैदान मारले …

दोहा : अखेर कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत अर्जेटिनाने पेनल्टी शुटआऊटमध्ये इतिहास रचत बाजी मारली आहे. फिफाचा अखेरचा सामना अत्यंत थरारक ठरला. या सामन्यात मेस्सी आणि एमबाप्पेनेच्या कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिना आणि फ्रान्सने ३-३ गोल केल्याने सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये पोहोचला. फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. मेस्सीनं २ आणि एमबाप्पेने २ गोल केले. दोन्ही संघांनी अतिरिक्त वेळेपर्यंत ३-३ गोल केल्यानं मॅच पेनल्टी शुट आऊटपर्यंत पोहोचली. पेनल्टी शुट आऊटमध्ये अर्जेटिनाने सलग चार गोल केले. तर, फ्रान्सचे दोन प्रयत्न हुकले आणि अर्जेटिनाने मैदान मारले.
ARGENTINA ARE WORLD CHAMPIONS!! 🇦🇷#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022