Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात बस जळून खाक

Spread the love

नाशिक-सिन्नर महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर भीषण अपघात झाला आहे. यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी वृत्त आहे. तर अपघातानंतर एस टी बसने पेट असल्याने बस जळून खाक झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडले. तसेच या बसने समोर असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली. यात तीन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. दरम्यान या ठिकाणी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे सद्यस्थितीत हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट नसून यंत्रणेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.


गुजरातमध्ये मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न


News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!