Rahul Gandhi News update : ताजी बातमी : खा. राहुल गांधी उद्या औरंगाबाद दौऱ्यावर….

औरंगाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त आहे. आजच्या महारष्ट्र दौऱ्यानंतर त्यांची यात्रा उद्या मध्य प्रदेशात जाणार होते परंतु हा दौरा बदलून ते उद्या ते औरंगाबादेत येत आहेत. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सायंकाळी ५.३० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शे ख युसुफ लीडर यांनी केले आहे.
औरंगाबाद काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी औरंगाबादमध्ये असणार आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सुरतला जाणार आहे. भारत जोडो यात्रा सुरु असतांना राहुल गांधी गुजरातला प्रचाराला जाणार आहेत. त्यासाठी ते औरंगाबादच्या विमानतळावरुन हेलीकॉप्टरने सुरतला जाणार आहेत. जळगाव जामोद वरुन राहुल गांधी औरंगाबाद विमानतळावर दुपारी साडेबाराच्या सुमारास येणार असून येथूनच ते सुरतला प्रचारसभेसाठी जाणार आहेत.त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान ते औरंगाबादमध्ये येणार आहेत. औरंगाबादमध्ये ते हॉटेल रामा इंटरनँशनलमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजताच ते भारत जोडो यात्रेसाठी रवाना होणार आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा शेवटचा दिवस आहे.
जयराम रमेश , कन्हैया कुमार यांचे स्वागत
रविवारी औरंगाबाद विमानतळावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. जयराम रमेश, कन्हैया कुमार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता अतुल लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लीडर,भाऊसाहेब जगताप, गौरव जैस्वाल, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसर बाबा, नानासाहेब धामणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांचा महाराष्ट्रात मुक्काम
राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन त्यांची यात्रा आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचत आहे. आज २० नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा जळगाव जामोद येथून निघून निमखेडी फाटा येथे ही पदयात्रा पोहचत आहे. निमखेडी फाटा येथे ‘युनिटी ऑफ लाईट’ हा एक छोटेखानी कार्यक्रम सायंकाळी ६. ३० वाजता होईल. त्यावेळी रंगीत विद्युत दिव्यांच्या सहाय्याने शानदार प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १८ नोव्हेंबरला शेगाव, १९ नोव्हेंबरला भेंडवळ येथे मुक्काम करून आज २० नोव्हेंबरला यात्रा निमखेडी मार्गे मध्यप्रदेशात जाणार होती. मात्र, राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाण्याचा निर्णय घेतल्याने यात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे.