ShivsenaNewsUpdate : सुषमा अंधारे यांचे शिंदे -फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार, एकाच दगडात मारले अनेक पक्षी …

कोल्हापूर : कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना . शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंधारे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून महिलांबाबत केलेल्या विधानांचा समाचार घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आदि नेत्यांवर जोरदार तोफा डागल्या.
यावेळीबोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्याच्या सरकारमध्ये महिलांचा कशा पद्धतीने अपमान केला जातो, ते अत्यंत वाईट आहे. सोलापूरचा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसोबत एका महिलेने हॉटेलमधून व्हिडीओ जारी केला होता. त्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला स्वत:चे नाव सांगत होती, संबंधित जिल्हाध्यक्षांचे नाव सांगत होती. त्यांच्या दोघांत काय नातं आहे? त्याचा खुलासा करत होती, हा माणूस अत्यंत नीच आहे, असेही ती महिला म्हणत होती. पण भारतीय जनता पार्टीने त्याच्याविरोधात विनयभंगाचा किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही.
फडणवीसांवर हल्ला बोल
देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेताना अंधारे म्हणाल्या की , “शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही असाच प्रकार केला. एका महिलेनं राहुल शेवाळेंसोबतचा लिफ्ट, मॉल आणि हॉटेलमधील विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल केले. तसेच राहुल शेवाळेंपासून आपल्या जीवाला धोका आहे, असेही त्या म्हणाल्या. पण देवेंद्रभाऊंना त्याबद्दल काहीच वाटले नाही. या लोकांची महिलांबद्दल काय मानसिकता आहे, हे यातून दिसते ” अशी टीका अंधारेंनी केली. फडणवीसांनी कोणतीच कारवाई न केल्याने संबंधित नेत्यांची हिंमत वाढली.
यावेळी गुलाब पाटलांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या कि, गुलाबराव पाटलांचा सरंजामी माज उफाळून आला.त्यांना वाटले की, देवेंद्रभाऊ तर काहीच करत नाही. त्यांनी आम्हाला आता मोकाटच सोडून दिलंय. बायकांना बोललल्यावर देवेंद्रभाऊंना जणूकाही फारच छान वाटतंय. त्यामुळे आपण काहीही बोलू शकतो. असा विचार करून गुलाबराव पाटील माझ्यावर घसरले. अर्थात त्यांचं माझ्यावर घसरणं मी फार सहज घेतलं. माणूस बावचळल्यावर असं करतो, असं समजून मी सोडून दिलं” अशी टोलेबाजी सुषमा अंधारेंनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार…
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार करताना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बळकावण्याच्या प्रयत्नांवरून शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं . त्या म्हणाल्या की , “साधारत: दीड ते दोन महिन्यांपूर्वी एका माणसावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक झाली होती. तो केवळ एकनाथभाऊंसारखे दिसतात, हाच त्याचा गुन्हा होता. त्याला एकनाथभाऊंसारखी दाढी आहे… मिशा आहे…. चष्मा आहे…, तो एकनाथ भाऊंसारखा फोटो काढतो, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली. संबंधित व्यक्ती आमचं नाव आणि चेहऱ्याचा दुरुपयोग करत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या गरीब माणसावर कारवाई केली.
“त्याच्यावर कारवाई करणारे आमचे एकनाथभाऊ होते. पण भाऊ तुम्ही काय केलं? भाऊ तुम्ही आमच्या शिवसेनेचे चेहरा घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शिवसेनेचं नाव घेण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखं सेनाभवन बांधण्याचा प्रयत्न केला. मग भाऊ तुमच्यावर कोणती कारवाई करायला हवी? हे सांगा ना…” असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.
यावेळी बोलताना अंधारे पुढे म्हणाल्या, “तुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती गरीब होती, म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात टाकलं. पण आता तुमचं काय करायचं भाऊ… अब तेरा क्या होगा कालिया? हे तर विचारावं लागेल ना? तुम्ही आरे म्हणाला तर आम्ही कारे म्हणू… आम्ही कारे नाही म्हटलं तर आम्ही शिवसैनिक कसले? आम्ही बिलकूल आरे ला कारे म्हणणार… तुम्ही दोन मजली नव्हे, तर दहा मजली सेनाभवन बांधू शकता, त्याला संगमरवराने सजवू शकता… पण त्याला जे अधिष्ठान हवं असतं, ते अधिष्ठान तुमच्या सेनाभवनाला मिळेलं का?” असा सवालही अंधारे यांनी विचारला.