IND vs PAK, T20 World Cup 2022 : पाकिस्तानवर ‘विराट विजय ‘ : करोडो भारतीयांना दिली दिवाळी भेट…

अश्विनने शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत भारताने पाकिस्तानला ४ विकेट्सने दणका दिला. अर्थातच भारताच्या विजयात विराट कोहलीचा धमाका पाहायला मिळाला. कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी खेळली. आणि भारताला विजय मिळवून दिला. विराट व्यतिरिक्त हार्दिक पांड्यानेही अप्रतिम खेळी खेळली, दोघांमध्ये ११३ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सामन्याचे फासेच फिरले. हार्दिकने ३७ चेंडूत ४० धावा केल्या, तर विराटने ५३ चेंडूत ६चौकार आणि ४ षटकारांसह ८२ धावा केल्या. अखेरच्या ३ षटकांत भारताने ४८ धावा करत शानदार विजय नोंदवला. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि मोहम्मद नवाज यांनी २-२ बळी घेतले.
The KING is back 👑
Take a bow, Virat Kohli 🙌#T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/OdAnbmso0h
— ICC (@ICC) October 23, 2022
तत्पूर्वी, पाकिस्तानने पहिल्या २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून शान मसूदने अर्धशतक झळकावले आणि इफ्तिखार अहमदने वेगवान धावा करत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. भारताकडून मसूदने ४२ चेंडूत ५२ धावा केल्या, तर इफ्तिखार अहमदने ३४ चेंडूत ५१ धावा केल्या, हार्दिक आणि अर्शदीपने ३-३ बळी घेतले. त्याचवेळी भुवी आणि शमीच्या खात्यात १-१ विकेट जमा झाली. तिथेच, अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून पाकिस्तानला ४ विकेट्सने दणका दिला.
क्षणाक्षणाला बदलणारी सामन्याची समीकरणे, प्रत्येक चेंडूवरचा ताण आणि सीमेपलीकडून सुटणारे श्वास. अखेर, विराट कोहलीच्या बॅटने शाहीन शाह आफ्रिदी आणि टीमला अस्मान दाखवले आणि देशाला एक संस्मरणीय दिवाळी भेट दिली. विजयासाठी १६० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली होती, पण कोहलीने ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या, दिवाळीच्या एक दिवस आधीच दिवाळी सेलिब्रेशनला सुरुवातकरून दिली.
असा रोमहर्षक झाला सामना…
भारतीय संघाला शेवटच्या दोन षटकात ३१ धावांची गरज होती. हरिस रौफने टाकलेल्या १९ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर कोहलीने दोन षटकार मारून शेवटच्या षटकात १६ धावांचे लक्ष्य कमी केले. हार्दिक पांड्याला पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नवाजने बाद केले. दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक तर कोहलीने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा केल्या. चौथा चेंडू नो-बॉल होता, ज्यावर कोहलीने षटकार मारला. आता तीन चेंडूत सहा धावा हव्या होत्या. पुढचा चेंडू वाईड होता, त्यानंतर बायने तीन धावा झाल्या पण पाचव्या चेंडूवर कार्तिक बाद झाला. आर अश्विनने शेवटच्या चेंडूवर धाव घेत संघाला विजय मिळवून दिला.
हार्दिक आणि कोहली यांच्यातील ११३ धावांची भागीदारी हा भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी केलेल्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आहे. भारताला २ षटकात ३१ धावांची गरज होती. १९ व्या षटकात भारताच्या १५ धावा झाल्या, तर २० व्या षटकात भारतीय संघाने भारताला जिंकण्यासाठी १६ धावा केल्या. भारताच्या या ऐतिहासिक विजयात कोहलीची बॅट जबरदस्त तळपली. विराटने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या, तर अश्विनने १ चेंडूत १ धावा करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (क), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग