Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationUpdate : सावधान : तुम्हाला “तनिष्क” सारख्या मोठ्या कंपनीची ऑफर्सची लिंक येऊ शकते , चुकूनही करू नका क्लिक …

Spread the love

आजकाल ऑनलाइन फसवणुकीच्या घटना खूप वाढल्या आहेत, म्हणून तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे.  दिवाळीच्या काळात या फसवणुकीचे प्रमाण अधिक असते, कारण या वेळी लोक भरपूर वस्तू खरेदी करतात. त्यांना अनेक ठिकाणांहून ऑफर्स मिळतात. यादरम्यान ते फसवणुकीच्या ऑफर्सचेही बळी ठरतात. फसवणूक करणारे आजकाल अॅपद्वारे लिंक पाठवतात. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता तेव्हा पहिल्यांदा  तनिष्कची लिंक दिसते आणि तुम्हाला वाटते की कदाचित हेच  मूळ पेज आहे, पण ते मूळ पेज नसते, तनिष्कच्या पेजचा स्क्रीनशॉट घेऊन ते फसवणूक करतात,  कारण  तुम्ही त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यास ते क्लिक होत नाही.


त्यानंतर लिंकवर गेल्यावर चार प्रश्न विचारले जातात. त्यावर उत्तर दिल्यानंतर ते तुमच्यासमोर अनेक बॉक्सचे पर्याय  ठेवतात, ज्यामध्ये एक किंवा दोन क्लिक केल्यानंतर तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर तुमचे बक्षीस जिंका असे सांगितले जाते आणि नंतर टर्म आणि कंडिशनच्या नावाखाली अनेक गोष्टी तुमच्याकडून करवून घेतल्या जातात आणि  बक्षीसाची रक्कम घ्यायची असेल तर पाच ग्रुप किंवा वीस जणांना लिंक पाठवा, असे तुम्हाला सांगितले जाते.

व्हॉट्सअॅपवर केवळ प्रमोशनचा विचार करून, तुम्ही ते लोकांना पुढे पाठवता. मग तुमची नोंदणी पूर्ण होते . त्यानंतर ते म्हणतात की आमची कंपनी तुम्हाला प्रमोशनसाठी गिफ्ट देऊ इच्छित आहे आणि तुम्ही त्यासाठी पात्र आहात, तुम्ही मोफत आयफोन जिंकला आहे. मग ते तुमचा फोन नंबर आणि ईमेल विचारतात. तपशील दिल्यानंतर कस्टम ड्युटीच्या नावाखाली पैसे मागतात. त्यांच्या बाजूने कस्टम अधिका-याचा फोन येतो  की तुमचा फोन अमेरिकेहून विमानतळावर आला आहे. असा कोणताही फोन नसताना तुम्हाला सांगितले जाते की, २०, ३० किंवा ४० हजार रुपये  भर मग  तुम्हाला दीड लाखाचा फोन मिळेल.

अशी फसवणूक करण्याचे काम अनेकजण मिळून करतात. सर्वजण एकाच जागी बसून तुम्हाला नियोजनपूर्वक जाळ्यात अडकवतात. म्हणूनच तुमच्याकडेही अशी लिंक आली असेल तर ती चुकूनही उघडू नका. तुमच्या मित्रांना पाठवू नका किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू नका. दिवाळीच्या वेळी तनिष्क किंवा कोणत्याही मोठ्या कंपनीच्या नावावर अशा फसवणुकीच्या घटना घडतात. म्हणूनच तुम्ही स्वतः सावध रहा आणि इतरांनाही सावध करा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!