Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Social Media Update : यूट्यूबच्या १० चॅनेलवर केंद्राची कारवाई , वादग्रस्त ४५ व्हिडीओ केले ब्लॉक …

Spread the love

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेविरुद्ध काम करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या यूट्यूबच्या १० चॅनेल आणि ४५ व्हिडिओंवर मोठी कारवाई केली आहे. मंत्रालयाने ४५ व्हिडिओ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. १ कोटी ३० लाखांहून अधिक लोकांनी हे व्हिडिओ पाहिले आहेत. २३ सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे.


माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १० यूट्यूब चॅनेलचे ४५ व्हिडिओ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, देशाविरुद्ध विष पसरवल्याबद्दल आणि द्वेष पसरवल्याबद्दल कारवाई केली आहे”. सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार हिरावून घेतल्याचा दावा या व्हिडिओंमध्ये करण्यात आला होता. अनुराग ठाकूर म्हणाले कि,  “अशा व्हिडिओंच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करून व्यवस्था बिघडवण्याचा कट रचण्यात आला होता.”

सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा कट…

मंत्रालयाने ब्लॉक केलेले काही व्हिडिओ अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र दल, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर आणि इतर मुद्द्यांवर प्रचार करण्यासाठी वापरले जात होते. त्याचप्रमाणे काही व्हिडिओंमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागांसह देशाची सीमाही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली होती. हे देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला मारक होते. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न…

मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, या व्हिडिओंच्या माध्यमातून पंतप्रधानांसह इतर राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा खराब करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबतच चीनच्या दिशेने घुसखोरीचा दावा करण्यात आला. व्हिडिओमध्ये एनएसएबद्दल आक्षेपार्ह टिप्पणीही करण्यात आली होती. इतकेच नाही तर भारतीय लष्करातील अंतर्गत कलहासारख्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी या व्हिडिओद्वारे केल्या गेल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!