Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : होय, हे हिंदुत्ववादी सरकार आहे ! दौलताबाद किल्ल्याचेही करणार नामांतर : मंगल प्रभात लोढा

Spread the love

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ दौलताबाद किल्ल्याचेही नाव “देवगिरी ” या नावंर बदलणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. ते म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्याचे ज्या पद्धतीने संभाजी नगर असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी करण्यात येणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्र भाजपने या विधानावर ट्विट केले आणि लिहिले की,  “होय हे हिंदुत्वाचे सरकार आहे.” ट्विटसोबतच महाराष्ट्र भाजपने त्यांचा व्हिडिओही ट्विट केला आहे.


प्रत्यक्षात औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी बदलण्यात आली आहेत. त्याचवेळी राज्य सरकार दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी करणार असल्याची घोषणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

मुघल सम्राट औरंगजेब जेव्हा या प्रदेशाचा गव्हर्नर होता तेव्हा त्याच्या नावावरून औरंगाबादचे नाव ठेवण्यात आले. दरम्यान या शहराचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. औरंगाबादचे नाव आता छत्रपती  संभाजीनगर करण्यात आले आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दिवंगत डी.बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवण्यात आले आहे.

याआधी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या राज्यातील अनेक शहरांची नावे बदलली होती. यूपी संगम शहर अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले. त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्य सरकारही अनेक नावे बदलत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!