Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : चित्त्यांसंबंधी प्रश्न विचारताच एमआयएमचे नेते ओवैसी यांनी दिली तिखट प्रतिक्रिया …

Spread the love

जयपूर : एएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तेथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. देशात जेव्हा जेव्हा महागाई आणि बेरोजगारीसारखे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा पंतप्रधान चित्त्यांपेक्षाही  वेगाने धावतात, अर्थात हे बोलत असताना त्यांनी पुढे म्हटले कि , सरकारने आपल्यावर यूएपीए लादू नये म्हणून आपण हा टोमणा केवळ सौम्यपणे मारत आहोत.


ओवेसी यांना मध्य प्रदेशात आणण्यात येत असलेल्या चित्त्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर खरपूस समाचार घेत ते म्हणाले की, जेव्हा आपण देशातील बेरोजगारीबद्दल बोलतो तेव्हा मोदी चित्त्यांनाही मागे सोडतात. चीनबद्दल प्रश्न विचारले असता ते चित्त्यापेक्षाही वेगाने धावतात. अशा परिस्थितीत ते खूप वेगवान असतात. ते बोलण्यातही खूप चपळ आहेत म्हणून आम्ही म्हणतो कि , त्यांनी थोडे सावकाश धावावे.

या निमित्ताने पंतप्रधानांवर निशाणा साधताना ते पुढे म्हणाले  की, आपल्यावर सरकारने ‘यूएपीए’ लादू नये म्हणून आपण हे सर्व काही विनोदाने बोलत आहोत. खरे तर ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही.  बऱ्याचदा मुद्दे वेगळे असतात पण ओवसीची तिखट शैली प्रत्येक वेळी पाहायला मिळते. या संभाषणादरम्यान ओवेसी यांनी ज्ञानवापी वादावर जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, असा निर्णय एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे अशी आणखी अनेक प्रकरणे उघड होणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!