IndiaNewsUpdate : मोदींच्या वाढदिवसाला चित्ते आले आले हे खरंय …पण , काँग्रेसने सांगितली त्याची इनसाईड स्टोरी ….

नवी दिल्ली : देशात सध्या नामिबीयावरून आलेल्या चित्त्यांची सर्वत्र चर्चा चालू असून यावर काँग्रेसने या चित्त्यांच्या आगमनामागची स्टोरी सांगितली आहे. जेंव्हा कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढ दिवसाची भेट दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते . या सर्व आठ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ‘प्रोजेक्ट चीता’ अंतर्गत सोडण्यात आले आहे. याबाबत काँग्रेसने ट्विट करीत दावा केला आहे की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात ‘प्रोजेक्ट चीता’चा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला १४ वर्षांपूर्वी २००८-०९ मध्ये हिरवा कंदील देण्यात आला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे ते आता पूर्ण होत आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचा फोटोही शेअर केला आहे. हा फोटो जयराम रमेश यांनी एप्रिल २०१० मध्ये आफ्रिकेतील चित्ता आउटरीच सेंटरला भेट दिल्याचा आहे.
'प्रोजेक्ट चीता' का प्रस्ताव 2008-09 में तैयार हुआ।
मनमोहन सिंह जी की सरकार ने इसे स्वीकृति दी।
अप्रैल 2010 में तत्कालीन वन एवं पर्यावरण मंत्री @Jairam_Ramesh जी अफ्रीका के चीता आउट रीच सेंटर गए।
2013 में सुप्रीम कोर्ट ने प्रोजेक्ट पर रोक लगाई, 2020 में रोक हटी।
अब चीते आएंगे pic.twitter.com/W1oBZ950Pz
— Congress (@INCIndia) September 16, 2022
यासोबत काँग्रेसने लिहिले आहे की, ‘प्रोजेक्ट चीता’चा प्रस्ताव २००८-०९ मध्ये तयार करण्यात आला होता. त्याला मनमोहन सिंग सरकारने मान्यता दिली. २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकल्पाला स्थगिती दिली, २०२० मध्ये काढण्यात आली त्यामुळे आता चिते येतील.
काँग्रेसच्या प्रयत्न्नांचे हे फळ…
दरम्यान काँग्रेस पक्षाच्या या ट्विटचे कारण ‘प्रोजेक्ट चीता’चे श्रेय घेण्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, त्यांच्या पक्षाच्या १४ वर्षांपूर्वीच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. नामिबियातून येणारे आठ चित्ते नामिबियातील सवानाच्या गवताळ प्रदेशातून येत आहेत. त्यांना ग्वाल्हेरजवळील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट चित्ता’ हा जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव स्थानांतर प्रकल्पांपैकी एक आहे.
या चित्त्यांना भारतात आणण्यासाठी विशेष बोईंग बी -७४७ जंबो जेट विमान नामिबियाहून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचवून तेथून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. आता या आठ चित्त्यांचे हे नवीन घर असेल ज्यामध्ये ५ माद्या आणि ३ नर आहेत.
पंतप्रधांनी विनाकारण रचला हा तमाशा…
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने हे एक ‘प्रहसन’ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राष्ट्रीय प्रश्न दडपण्यासाठी आणि ‘भारत जोडो यात्रे’वरून लक्ष वळवण्यासाठी हे ‘प्रहसन’ रचण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, “पंतप्रधान क्वचितच प्रशासनातील सातत्य स्वीकारतात. चीता प्रकल्पासाठी २५ एप्रिल २०१० रोजी माझी केपटाऊन भेट हे त्याचे ताजे उदाहरण आहे. आज पंतप्रधानांनी विनाकारण तमाशा रचला आहे. राष्ट्रीय प्रश्न दडपण्याचा आणि भारत जोडो यात्रेवरून लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे.
पीएम शासन में निरंतरता को शायद ही कभी स्वीकार करते हैं। चीता प्रोजेक्ट के लिए 25.04.2010 को केपटाउन की मेरी यात्रा का ज़िक्र तक न होना इसका ताज़ा उदाहरण है। आज पीएम ने बेवजह का तमाशा खड़ा किया। ये राष्ट्रीय मुद्दों को दबाने और #BharatJodoYatra से ध्यान भटकाने का प्रयास है। 1/2 pic.twitter.com/V0Io8OMYyD
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 17, 2022
चित्ता प्रकल्पासाठी अभिनंदन
“२००९-११ मध्ये, जेव्हा वाघांना पहिल्यांदा पन्ना आणि सरिस्का येथे हलवण्यात आले, तेव्हा अनेक लोक भीती व्यक्त करत होते. ते चुकीचे सिद्ध झाले. चित्ता प्रकल्पाबाबतही असेच अंदाज वर्तवले जात आहेत. यामध्ये गुंतलेले व्यावसायिक खूप चांगले आहेत. या प्रकल्पासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो!” असेही जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.