Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RSSNewsUpdate : चर्चेतली बातमी : ९२ वर्षात आरएसएसने घेतला मोठा निर्णय !!

Spread the love

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला यावर्षी ९२ वर्षात पहिल्यांदाच एका महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. संघाच्या नागपुरातील मुख्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ५ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी हि माहिती दिली आहे.


दरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर सरसंघचालकांनी केलेले भाषण संघासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यानिमित्ताने देश आणि समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संघ परिवाराचे प्रमुख म्हणून संघाची भूमिका मंडळी जाते. याकडे संघाचा अजेंडा म्हणूनही पाहिले जाते, ज्यावर ते आगामी वर्षांसाठी कार्य करतात. संतोष यादव ही पहिली महिला गिर्यारोहक आहे जिने दोनदा एव्हरेस्ट सर केला आहे. मे १९९२ मध्ये तिने पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर गाठले. यानंतर त्यांनी मे १९९३ मध्ये दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर केला. संतोष यादव यांना १९९४ मध्ये राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि २००० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.

आधी भाजप आणि आता संघाचेही महिलांकडे विशेष लक्ष…

एकीकडे आगामी लोकसभा निवडणूक समोर ठेवून भाजपाकडून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे भाजपाची मातृसंस्था असलेल्या ‘आरएसएस’ नेही महिलांकडे आपले लक्ष वळवले आहे हे यातून दिसून येत आहे. १९२५ साली नागपूरमध्ये दसरा सणानिमित्त आरएसएसची स्थापना करण्यात आली होती. याच कारणामुळे आरएसएससाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आरएसएसच्या नागपूरमधील मुख्यालयात शस्त्रपूजन केले जाते.


संतोष यादव यांना निमंत्रित करण्याकडे संघाच्या दृष्टिकोनातील बदल म्हणूनही पाहिले जात आहे. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी,  स्त्रिया जैविकदृष्ट्या पुरुषांपेक्षा भिन्न असू शकतात, परंतु कार्यक्षमतेत आणि कार्यक्षमतेत त्या पुरुषांसारख्याच आहेत. महिलांना आपण एकीकडे जगत्जननी म्हणतो आणि दुसरीकडे त्यांना घरात गुलामांसारखी वागणूक दिली जाते. स्त्रियांविषयीचे हे मत बदलून महिलांच्या सक्षमीकरणाची सुरुवात घरापासून झाली पाहिजे आणि त्यांना समाजात त्यांचे योग्य स्थान मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली होती.

संघाचे आजवरचे पाहुणे …

गेल्या काही वर्षांत संघाने एचसीएलचे संस्थापकअध्यक्ष शिव नाडर, डीआरडीओचे माजी महासंचालक विजय कुमार सारस्वत,  माजी सीबीआय प्रमुख जोगिंदर सिंग, नेपाळचे माजी लष्करप्रमुख रुकमंगुड कटवाल;आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आर एस गवई, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी आणि देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही आपल्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले होते. मात्र, प्रणव मुखर्जी यांनी संघ मुख्यालयात जाऊन कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली. हे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांच्या विरोधात असल्याचे सांगत काँग्रेस आणि धर्मनिरेक्षवादी लोकांनीही त्यांचा निषेध केला होता.


दरम्यान आरएसएस ही फक्त पुरुषांची संघटना असून या संघटनेत महिलांना कुठलेही स्थान नाही असा आरोप सातत्याने करण्यात आलेला आहे. पुढे १९३६ साली आरएसएसकडून ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्थापन करण्यात आली. यामध्ये फक्त महिला स्वयंसेविका असतात. असे असले तरी संघाची ओळख ही पुरुष स्वयंसेवकांच्या रुपातच आहे, असे म्हटले जाते. राष्ट् सेविका समितिची रचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच आहे. आरएसएसमध्ये स्वयंसेवक तर राष्ट्र सेविका समितीमध्ये प्रचारिका असतात. महिला प्रचारिकांच्या प्रशिक्षण शिबिरांना संघ शिक्षा वर्ग म्हटले जाते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!