Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Vedanta Controversy Update : वेदांता प्रकल्प वादावर शरद प्रकल्पावर दिली हि प्रतिक्रिया …

Spread the love

पुणे : महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारणात वाद विवाद सुरु झाले आहेत.  यावरून सत्ताधारी आघाडी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला तत्कालिन महाविकासआघाडी सरकार जबाबदार आहे, अशी टीका सरकारकडून करण्यात येत असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र वेदांता प्रकल्पाबाबत वेगळीच माहिती दिली आहे.


पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , ‘वेदांता प्रकल्प येणार असला तर शेवटपर्यंत येईल का नाही, याबाबत मला शंका होती, कारण यापूर्वीही असे  एकदा झाले  होते, फार पूर्वी  हा प्रकल्प तळेगावला येणार होता, राज्य सरकारनेही तयारी केली होती, पण आता काही उपयोग नाही. आता चर्चा करण्यात अर्थ नाही. आता जे गेले  ते गेले, नवीन काय आणता येईल ते बघायला हवे. योग्य वातावरण निर्माण करायला हवे.

दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही शरद पवारांनी टीका आहे.  कि , उद्योगमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं, ते म्हणाले गेल्या वेळच्या सरकारची जबाबदारी आहे, पण गंमत आहे हे तिथेपण मंत्री होते. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला आणखी मोठा प्रोजेक्ट देण्याचं आश्वासन मिळाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं, यावरही पवारांनी टोला हाणला. लहान मुलाची समजूत काढावी, तसं पंतप्रधान बोलले आहेत, असं वक्तव्य पवारांनी केलं.

‘गुजरातला काही गेलं तर तक्रार करायची गरज नाही. आता ते दोघं गुजरातचे आहेत. घराकडे ओढ असणं साहजिक आहे. आता जे गेलं ते गेलं, नवीन काय आणता येईल ते बघायला हवं. भरपूर जेवण झाल्यावर माणूस थंड होतो, तसं महाराष्ट्राचं झालंय, त्यामुळे नेतृत्वाने प्रयत्न करण्याची गरज आहे. योग्य वातावरण निर्माण करायला हवं. रोज काय झाड डोंगर दाखवता, आता राज्याचा विचार होण्याची गरज आहे. राज्य सरकार इतर बाबतीत फार गतिमान आहे,’ अशी बोचरी टीकाही शरद पवारांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांची अजित पवार यांच्यावर टीका

दरम्यान ‘वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजराजला जाण्यावरून राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला. पण, हा वाद राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांना सगळी माहिती असेल, त्यांनी या प्रकल्पासाठी क्लोजर रिपोर्ट का दिला नाही, असा गंभीर आरोप बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


प्रकाश आंबेडकर यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले कि , मविआ सरकार असताना अजित पवारांनी या प्रोजेक्टचा क्लोजर रिपोर्ट का दिला नाही. या प्रकल्पला १२ हजार कोटींची सबसिडी म्हणा किंवा बेनिफीट देणार होते. तर दुसरीकडे २६ हजार कोटी वार्षिक उत्पन्न होईल, असे सांगितले  जात आहे. पण या ज्या नऊरत्न कंपन्या आहे, या कंपन्यांचे जेवढे  उत्पन्न आहे, ते अजून केंद्राचे सुद्धा नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उकाईचं पाणी सुद्धा गुजरातला गेलं होतं. त्यामुळे नवीन काही नाही. जिथे जिथे फडणवीस असतील तिथे हे प्रश्न येतील. भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आले तेव्हा अर्धे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे ट्विट

दरम्यान वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्राबाबतचे  त्यांचे  व्हिजन सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये कंपनी लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्याचे ट्वीट अग्रवाल यांनी केले आहे. ‘आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गुजरात जेव्हीमध्ये महाराष्ट्र हा आमच्या पुढच्या एकीकरणाचा भाग असेल, यातून आम्ही महाराष्ट्रामध्ये हब बनवू,’ असे  आश्वासन वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!