Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GoaNewsUpdate : राहुल गांधी “भारत जोडो” यात्रा काढत आहेत तर गोव्यात “काँग्रेस छोडो” यात्रा सुरु आहे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Spread the love

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि , एकीकडे राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ करत असताना दुसरीकडे गोव्यातून “काँग्रेस छोडो यात्रा”  सुरू झाली आहे. काँग्रेसचे उर्वरित नेतेही पक्ष सोडणार आहेत. देशहितासाठी ते भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात सामील ते होतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरून विश्वास ठेवून काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये आले आहेत.


काँग्रेसचे तीन आमदार का सोडले, त्यांच्याशी संपर्क साधला नाही का ? या प्रश्नावर सावंत म्हणाले, “काँग्रेसचे आमदार कोणत्याही पूर्व अटीशिवाय भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा होता, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही. आता काँग्रेसमध्ये नेतृत्व उरले नाही.” अन्य एका प्रश्नावर ते म्हणाले, “मी या आमदारांसह दिल्लीला जाणार आहे. सध्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे नियोजन नाही.” मायकल लोबो यांच्याबाबत बोलताना ते  म्हणाले की, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर लोबो यांना त्यांची चूक लक्षात आली.

काँग्रेसच्या आमदारांना काय आश्वासन दिलंय ? दिगंबर कामत, मायकल लोबो यांसारख्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करणार का?  या प्रश्नाला उत्तर देताना सावंत म्हणाले की, कामत हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते आहेत. तर  मायकल लोबो आणि इतर आमदारांनीही कोणतीही अट घातली नाही.

दरम्यान आज सकाळच्या राज्यपालांच्या भेटीबाबत सावंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांच्याशी  माझी पूर्वनियोजित बैठक होती.  देशासमोर भाजप हा एकमेव पर्याय आहे. देश फक्त मोदीच चालवू शकतात. त्यामुळे लोक भाजपकडे येत आहेत. गोव्यात एकही प्रबळ विरोधक उरलेला नाही, याला उत्तर देताना सावंत म्हणाले की, विरोधी पक्षातही तीन पक्ष आहेत. अर्थात त्यांच्याकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत पण त्यांनी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करायला हवे. लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष असणेही गरजेचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!