Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CMNewsUpdate : मुख्यमंत्री दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर , विद्यापीठाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षांचे नाव नसल्याने संताप …

Spread the love

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  त्यांच्या हस्ते दि . १६ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे शुक्रवारी सायंकाळी अनावरण होणार आहे. तर दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनी त्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.


दरम्यान विद्यापीठाच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे न टाकल्याने विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्यावरून टीका केली आहे. 


याबाबत भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ यांनी कुलगुरु डाॅ. प्रमोद येवले यांच्याकडे या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि लोकप्रतिनिधींची नावे नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठासारख्या शैक्षणिक क्षेत्रात गटतटाचे राजकारण होता कामा नये, असे सराफ यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुण्यांमध्ये केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्यातील मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, अतुल सावे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्हयातील सर्व खासदार, आमदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह  स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे निमंत्रण पत्रिकेत न टाकल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसीय दौरा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि.१६ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी. ०२.३० वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण

दुपारी २:४५ वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव

दुपारी ३:३० वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण.

दुपारी ०४.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण व राखीव.

सायं. ०५.३० वा. विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट व राखीय, (स्थळ:- सिध्दार्थ गार्डन शेजारी, औरंगाबाद.)

सायं ०५.४५ वा. सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे प्रयाण.

सायं ०६.०० वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद.)

सायं. ०६.३० वा. तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.

रात्री ०७.१५ वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

शनिवार, दि.१७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०६.३० वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे प्रयाण.

सकाळी ०७.०० वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम.( स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.)

सकाळी ०७.१५ वा. सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण

सकाळी ०७.३५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने हैद्राबाद विमानतळाकडे प्रयाण.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ध्वजारोहण होणारअसून ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्याची यादी जाहीर केली आहे. ज्यात औरंगाबाद येथील ध्वजारोहण नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून नांदेड येथील ध्वजारोहण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. याशिवाय हिंगोली येथे वन मंत्री सुधीर मूनगंटीवार, लातूर येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, परभणी येथे सहकार मंत्री अतुल सावे, बीड येथे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, उस्मानाबाद येथे उद्योग मंत्री तानाजी सावंत, तर जालना येथे  कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

ध्वजारोहणाचा वेळ न बदलण्याची अंबादास दानवे यांची मागणी

दरम्यान नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेतच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादमध्ये कार्यक्रम व्हावा , मात्र या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही. दिल्लीहून ‘बादशहा’ हैदराबादला येणार आहेत, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाण्यासाठी म्हणून हा वेळ बदलला जात आहे. मात्र, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशा इशारा विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला.


दानवे पुढे म्हणाले, राज्य सरकारने ७५ व्या मराठवाडा मुक्ती दिनाची दखल घेतलेली नाही. औरंगाबाद येथे होणारा कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच दिवशी गृहमंत्री अमित शहा यांच्या हैदराबादला होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहायचे आहे. यामुळे शहरातील कार्यक्रम सकाळी ७ वाजता घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीसाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू असेही दानवे म्हणाले.

दरम्यान वेदांता आपल्याकडे येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. तरी प्रकल्प गुजरातला पळवला जातो. वेदांता प्रकल्पासाठी कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होता. परंतु, गुजरातचा कधीच नव्हता. या प्रकल्पामुळे राज्यातील १ लाख युवकांना रोजगार मिळाला असता. मात्र, दिल्लीच्या बादशहाचे हस्तक असलेले राज्य सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!