AurangabadNewsUpdate : श्रीमद जिनेंद्र महाआरती नृत्य स्पर्धा , आदीनाथ ग्रुप अरिहंतनगर सर्व प्रथम

औरंगाबाद : खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पाश्श्र्वनाथ मंदिर राजाबजार अंतर्गत पुलक मंच परिवार यांच्या संयुक्त विदयमाने पर्युषण पर्वाचे औचित्य साधुन राष्ट्रसंत भारत गौरव पुलकसागरजी महाराज यांच्या सानिध्यात प्रथमच राज्यस्तरीय महाआरती नृत्य स्पर्धेचे आयोजन हिराचंद कासलीवाल प्रांगण आचार्य गुप्तीनंदी गुरâदेव सभागृहात करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेमध्ये १६ गटांनी आपला सहभाग नोदविला होता. यामध्ये आदीनाथ ग्रुप अरिहंतनगरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेसाठी अश्श्विनकुमार निरजकुमार सुधाकर साहुजी, करुणा विलास साहुजी, प्रिया जितेंद्र अग्रवाल व उर्मिला प्रमोद ठोलीया, तुषार प्रदिप पहाडे, अजित जैन रवि मसाले हे प्रायोजक म्हणून लाभले होते. तर अमोल खंडाळे, सागर जगधने व अल्पा शाह यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यकमाचे सुत्रसंचालन रश्मी पाटणी व सोनाली कटारीया यांनी केले तर मंगलाचरण सपना पापडीवाल व शोभा अजमेरा यांनी केले. यामध्ये स्पर्धेकांनी विविध प्रकारचे पोशाख परिधान करून भगवंताची नृत्य सादर करून भगवंताची महाआरती केली.
पारितोषिक विजेते संघ
यामध्ये प्रथम पारितोषिक आदीनाथ ग्रुप अरिहंतनगरच्या हिना पहाडे, सोनाली पाटणी, प्राची पाटणी, रुचि पाटणी, सिमा रावका, योगीता कासलीवाल, रचना कासलीवाल, आरती कासलीवाल, जयश्री लोहाडे यांना प्रथम पारितोषिक रोख ३१ हजार रुपये देण्यात आले यांनी हे पारितोषिक आचार्य पुलकसागरजी महाराज निर्मीत जीनशरम तीर्थ या क्षेत्राला निर्माण कार्यासाठी मदत म्हणून विनोद जैन, उमेश जैन यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली. तसेच व्दितीय क्रमांक अहिंसा ग्रुप एम २ यांना मिळाला तर तृतीय क्रमांक राजमयुरा ग्रुप यांना मिळाला. यावेळी पुलक मंच व जैन जागृती महिला मंच चे सर्व सदस्य फेटे परिधान केले होते. सेठी नगर, वेरूल, ठाकरे नगर, देशमुखनगर,बालाजी नगर,जवाहर कॉलनी, सिडको,राजाबजार, अरिहंतनगर आदी ग्रुपच्या सदस्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
यांनी घेतले परिश्रम…
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजाबजार जैन पंचायत, चातुर्मास समिती, पुलक मंच परिवार औरंगाबाद यांच्यासह या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख सुमित ठोळे, अभिजीत पाटणी, संजय सिंघही, अक्षय पाटणी सुप्रम जैन कविता अजमेरा आणि सुमित पाटणी हे होते. संपुर्ण कार्यकम यशस्वी करण्यासाठी श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत,चातुर्मास समिती आणि पूलकमंच परिवार, पुलकमंच महिला मंडळ च्या वतीने पंचायत व चातुर्मास अध्यक्ष ललीत पाटणी,कार्याध्यक्ष महावीर पाटणी,चातुर्मास मंत्री प्रकाश अजमेरा,संरक्षक सुनिल काला यांच्यासह पुलक मंच शहर शाखेचे अध्यक्ष सुचित बाकलीवाल,महामंत्री सागर पाटणी,उपाध्यक्ष प्रशांत पांडे,उपमहामंत्री अमित पहाडे,राजाबजार शाखा अध्यक्ष दिलीप कासलीवाल,महामंत्री शांतीलाल पाटणी,प्रसाद पाटणी,महिला राजाबजार शाखा अध्यक्षा कांताबाई पहाडे,महामंत्री निता ठोले,हडको शाखा अध्यक्ष किरण पांडे,महामंत्री ज्योती पाटणी,अरिहंतनगर शाखा अध्यक्षा सिमा पाटणी,महामंत्री सपना पापडीवाल,सिडको शाखा अध्यक्षा रश्मी पाटणी,महामंत्री मोनिका पाटणी यांच्यासह पुलक मंच शाखा आदींनी परिश्रम घेतले.