Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCRBReportUpdate : अपघात , आत्महत्या यामुळे देशात किती मृत्यू झाले ? आणि गुन्हेगारीत किती वाढ झाली ?

Spread the love

मुंबई : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) देशातील गुन्हेगारीचा, अपघाती मृत्यूचा आणि आत्महत्यांची आकडेवारी जारी केली आहे. अपघाताबरोबरच सर्वाधिक मृत्यू कौटुंबिक कलहातून आणि बेरोजगारीमुळे झाले असल्याचे दिसून येत आहे. या आकडेवारीनुसार गेल्या या दोन वर्षांतील आत्महत्यांची आकडेवारी ही मागच्या जवळपास 55 वर्षांनंतर सर्वाधिक आहे.


 • भारतात अपघात
  अपघाती मृत्यू :
  2020 : 3,74,397 अपघाती मृत्यूचा दर : 27.7
  2021 : 3,97,530 , अपघाती मृत्यूचा दर : 29.1
  * दर लाख लोकसंख्येनुसार आहे
 • भारतात आत्महत्या
  2020 : 1,53,052
  2021 : 1,64,033
  *आत्महत्येचा दर 11.3 12.0
  * दर लाख लोकसंख्येनुसार आहे.


NCRB च्या आकडेवारीनुसार देशात 1967 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दर 10 लाख लोकसंख्येमागे 120 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. हा दर 2020 च्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी जास्त आहे. यापूर्वी 2010 मध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली होती. तेव्हा दर 10 लाख लोकांमागे 113 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. देशात 2021 मध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आत्महत्येच्या बाबतीत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


सर्वाधिक आत्महत्या वाढत्या बेरोजगारीमुळे…

दरम्यान आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कमी उत्पन्न असलेल्या लोकांचा समावेश जास्त आहे, असं आकडेवारीवरून दिसून येतंय. एकूण आत्महत्येच्या प्रकरणांपैकी दोन तृतीयांश लोक वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गातील आहेत. याशिवाय 2021 मध्ये लहान व्यापारी आणि रोजंदारीवर पोट भरणाऱ्या लोकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ नोकरी शोधणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो.

गुन्ह्याच्या प्रमाणातही मोठी वाढ…

या अहवालानुसार 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षांच्या तुलनेत 2021 मध्ये गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात दाखल झालेल्या गुन्ह्यांव्यतिरिक्त 2020 मध्ये 46 लाख आणि 2021 मध्ये 50 लाख गुन्हे दाखल झाले होते. कोरोना काळात गुन्ह्यांमध्ये घट नोंदवण्यात आली होती. 2020 मध्ये  66 लाख गुन्हे दाखल झाले होते, तेच 2021 मध्ये 61 लाखांवर गुन्हे दाखल झाले. त्याचबरोबर कोरोना काळात निर्बंध शिथिल केल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले. 2021 मध्ये अपघातात जीव गमावणाऱ्यांची 3.74 लाखांवरून 3.97लाख झाली होती. याशिवाय इतर कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमध्येही मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं.

आकस्मिक मृत्यू कमी

2020 च्या तुलनेत 2021 मध्ये भूकंप, पूर किंवा उष्णतेमुळे झालेल्या आकस्मिक मृत्युंची नोंद खूप कमी झाली आहे. 2020 मध्ये 7,405 नागरिकांचा आकस्मिक मृत्यू झाला, तर 2021 मध्ये 7,126 जणांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये आकस्मिक मृत्यूमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 8,145 होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!