Raju Srivastav Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक …

नवी दिल्ली : कॉमेडीचा बादशाह म्हटल्या जाणार्या राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले असून २४ तासांनंतरही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे.
एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूला हृदयविकाराच्या झटक्याने मोठे नुकसान झाले होते. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जशी होती तशीच असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.
राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने सांगितले की, “त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती सुधारली नाही किंवा बिघडलेली नाही. त्याच्या आरोग्यासाठी संपूर्ण वैद्यकीय पथक प्रयत्नशील आहे. आम्ही फक्त प्रार्थना करत आहोत आणि आशा करतो की ते लवकर बरे होतील. सध्या माझी आई त्याच्यासोबत आयसीयूमध्ये आहे.
ते नेहमीच फिटनेसची काळजी घेतात…
अंतराने सांगितले की, माझे वडील अनेकदा दिल्लीहून इतर ठिकाणी जातात. त्यामुळेच चांगल्या आरोग्यासाठी ते आपल्या दैनंदिन वर्कआउटबद्दल नेहमीच दक्ष असतात. त्यासाठी ते रोज जीम मध्ये जातात आणि व्यायाम करतात. यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. त्यांना हृदयविकार नव्हता. त्यांची प्रकृती नेहमीच ठणठणीत असायची त्यामुळेच हे आमच्यासाठी धक्कादायक आहे.
दरम्यान एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली टीम राजू श्रीवास्तव यांच्यावॉर उपचार चालू असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. बुधवारी, राजू श्रीवास्तव यांचा जवळचा सहकारी सुनील यानेही सोशल मीडियावर चाहत्यांसह त्यांचे आरोग्य अपडेट शेअर केले. यासोबतच लोकांना त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यासही सांगण्यात आले.
राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर तो बिग बॉस सीझन ३ मध्येही दिसले. राजू हा कॉमेडी शो महामुकाबलाचाही भाग होता. राजू आपल्या पत्नीसोबत नच बलिएच्या सीझन ६ मध्ये देखील दिसला आहे. या सर्वांशिवाय राजूने अनेक बॉलिवूड चित्रपटांमधूनही गाजलेल्या विनोदी भूमिका केलेल्या आहेत. राजू सध्या उत्तर प्रदेशच्या चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत.