Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची पुन्हा स्थापना

Spread the love

मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सात जणांच्या विशेष स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बालाजी खातगावकर खाजगी सचिव, नितीन दळवी, डॉ. राजेश कवळे, डॉ. राहुल गेठे यांची विशेष कार्य अधिकारी तर प्रभाकर काळे स्वीय सहायक, प्रदीप जेठवा कक्ष अधिकारी आणि मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे. या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सोमवारी चिवटे कक्ष प्रमुखाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हा कक्ष सुरू होता माञ अनेक जाचक अटींमुळे त्याचा लाभ मोठया संख्येने गरजूंना होऊ शकला नव्हता.

मंगेश चिवटे – विशेष कार्य अधिकारी

बालाजी खातगावकर – आत्तापर्यंत ठाणे उपायुक्त, भिवंडी उल्लानगर, मिरा भाईंदर येथे आयुक्त म्हणून काम केलं आहे. 2019 पासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत.

नितीन दळवी – सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी विधान मंडळातील कामकाज पाहतात

राजेश कवळे – नाशिक विभागात विविध पदांवर कार्यरत होते. 2014 पासून एकनाथ शिंदे यांच्याकडे काम करत आहेत. सर्व आमदारांच्या अडचणी समजून घेणे आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवणे हे त्याचं काम होतं

राहुल गेठे – उपायुक्त म्हणुन नवी मुंबई पालिकेत कार्यरत होतें. एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्याकडे गडचिरोली आणि नागपूरची जबाबदारी देण्यात आली होती. कोरोना काळात एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारासाठी मदतीच काम यांनी केलं. यामधे कोव्हिड सेंटर मजूर करणे आणि ती पोहचवणे याचं काम पाहिल

प्रभाकर काळे – सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणून  काम करतात

आपलं सरकार

Click to listen highlighted text!