OBCReservationUpdate : नवीन सरकारचा पायगुण चांगला : मुख्यमंत्री , महायुतीने शब्द पाळला : फडणवीस

मुंबई : राज्यातील ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाने सोडवताच राज्याचे नवे मुख्यमंत्री यांनी ट्विट करून “एकदा शब्द दिला कि , तो पाळणारच…” असे म्हणत शिंदे यांनी ओबीसी समाजाचे अभिनंदन केले आहे. राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका युती सरकारची होती. त्यासाठी, आम्ही वेळोवेळी दिल्लीत सिनियर कॉन्सिलशी चर्चा केली, बैठका घेतल्या. नवीन सरकारचा पायगुण ओबीसी समाजासाठी चांगला आहे. म्हणून, आज ओबीसी समाजाच्या बांठिया आयोगाच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या आहेत. या आरक्षणासाठी मदत करणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1549695253783130114
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सर्व परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल. कारण, या निवडणुकांसाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि इतरही महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे, निवडणुकींसाठी आम्ही वेळ मागितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Promise kept ! This is victory of OBC community of Maharashtra !
वचनपूर्तीचा क्षण…
महाराष्ट्रातील सर्वसामान्य ओबीसी आज जिंकला आहे. माध्यमांशी संवाद….#OBC #OBCreservation https://t.co/Tbl2MZqhrl— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) July 20, 2022
महायुतीने शब्द पाळला : फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला! सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील. ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे मन:पूर्वक आभार!”