ShivsenaNewsUpdate : मध्यावधी निवडणूक घ्या , उद्धव ठाकरे यांचे आव्हान

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे गट आणि राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. पत्रकार परीक्षेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , मी बंडखोरांना शिवसेनेचे चिन्ह वापरू देणार नाही, तो प्रश्नच उद्भवत नाही.
आपण विरोधकांना राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्याचे आव्हान देत आहोत. आम्ही चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी पाठवतील. दरम्यान भाजपने घेतलेल्या भूमिकवबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , भाजपाला हेच करायचे होते तर हा खेळ का केला ? त्यांनी जे आज केले आहे ते अडीच वर्षांपूर्वी केले असते तर मी जे काही ऐकतो आहे शंभर कोटी , दोनशे तीनशे कोटी , हे मला नेमके माहित नाहीत नाही पण हे काही झाले नसते. अडीच वर्षांपूर्वी करायला हवं होतं. तुम्ही हे केले असते तर कदाचित राज्यातील सरकार पाडण्यासाठी तुम्हाला हे सर्व करावे लागले नसते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे बाण आणि धनुष्य चिन्ह कोणीही घेऊ शकत नाही. जरी लोक नुसते चिन्ह पाहत नाहीत तर ते चिन्ह कोणी घेतले आहे हे देखील पहातात. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह बंडखोर आमदारांवरही त्यांनी निशाणा साधला. गेली अडीच वर्षे भाजपच्या लोकांनी मला व माझ्या कुटुंबियांना शिवीगाळ केली तेव्हा तुम्ही गप्प बसलात, आणि त्यांच्याशी तुम्ही जवळीक साधून आहात यात तुम्हाला आनंद असेल तर ठीक आहे.
दरम्यान ” शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत ते म्हणाले, “धनुष्यबाण हे आमचे चिन्ह आहे, ते कोणीही आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, असे मी सर्वांना सांगितले. पण लोक नुसते धनुष्यबाण करत नाहीत, ते चिन्ह कोणाचे आहे ते पाहतात. ठाकरे म्हणाले कि , जे काही नगरसेवक त्यांच्या गटाला जाऊन मिळाले म्हणतात ते त्यांचे कार्यकर्ते असतील सध्या सर्वच महापालिका बरखास्त आहेत. त्यामुळे नगरसेवक गेले असे म्हणता येणार नाही. शिवसेनेने काहीही न बघता छोट्या, साध्या लोकांना मोठं केलं याचा मला अभिमान आहे. जे मोठे झाले ते निघून गेले पण आमच्या सोबत असलेली साधी माणसे आमच्या सोबत आहेत.” असेही ठाकरे म्हणाले.