Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सेवानिवृत्तीच्या तीन दिवसानंतर संजय पांडे यांच्या हातात ईडीचे समन्स …

Spread the love

मुंबई : एकीकडे राज्यात सत्ता बदलाचे राजकारण जोरात असताना दुसरीकडे ईडी ची कारवाई सुद्धा चाल्लूच आहे. सध्या या दोन्हीही कारवायांच्या चर्चा महाराष्ट्रात जोरात चालू असतानाच  मुंबईच्या  पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त होऊन तीन दिवस उलटत नाहीत तोच सेवानिवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स जारी करण्यात आले असल्याचे वृत्त आहे . या सामन्सनुसार त्यांना  ५ जुलै रोजी साडे अकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमक्या कोणत्या प्रकरणात ईडीकडून त्यांना समन्स जारी करण्यात आले आहेत याबाबतची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी  आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचे  नाव समोर आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केला असल्याचे सांगण्यात येत आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!