Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : शिंदे सरकारची बहूमत चाचणीची तयारी पूर्ण , तर शिवसेनेकडून कायद्याचे “बाण” चालविण्याचा निर्धार …

Spread the love

मुंबई : आज विधानसभेत होणाऱ्या शिंदे सरकारच्या बहूमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची बैठक हॉटेल ताज येथे पार पडली तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटातील हालचाली मात्र पडद्याआड राहिल्या. दरम्यान शिवसेनेनेच्या वतीने शिंदे गटाच्या विरोधात कायद्याची  लढाई लढण्यासाठी तयारी सुरु असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दरम्यान विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेच्या दोन्हीही नियुक्त्या रद्द करण्याचे पत्र देऊन शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. काल सकाळी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळवून विजय प्राप्त करताच शिंदे सरकारचा हा पहिला विजय मानला जात आहे. आज  भाजपा आणि शिंदे गटाला विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे  जावे लागणार असून त्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पक्षाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या बैठकीला मार्गदर्शन केले.

दरम्यान शिवसेनेचे नेते खा. अरविंद सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या व्हिपच्या विरुद्ध जाऊन शिंदे गटाला मतदान केल्याबद्दल “त्या ” ३९ आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र  विधानसभेच्या अध्यक्षांना दिल्याचे सांगितले. दरम्यान हि घटनेची पायमल्ली असून त्याच्याविरुद्ध शिवसेना न्यायालयात धाव घेईल असेही त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!