MaharashtraPoliticalUpdate : शिंदे सरकारची बहूमत चाचणीची तयारी पूर्ण , तर शिवसेनेकडून कायद्याचे “बाण” चालविण्याचा निर्धार …

मुंबई : आज विधानसभेत होणाऱ्या शिंदे सरकारच्या बहूमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची बैठक हॉटेल ताज येथे पार पडली तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटातील हालचाली मात्र पडद्याआड राहिल्या. दरम्यान शिवसेनेनेच्या वतीने शिंदे गटाच्या विरोधात कायद्याची लढाई लढण्यासाठी तयारी सुरु असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Eknath Shinde-led Maharashtra govt to face floor test on Monday
Read @ANI Story |https://t.co/Epex4mWViC#MaharashtraPolitics #EknathShinde #FloorTest pic.twitter.com/XwjbMlvs7p
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2022
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/qz4xSxqWgz
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 3, 2022
दरम्यान विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेच्या दोन्हीही नियुक्त्या रद्द करण्याचे पत्र देऊन शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. काल सकाळी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळवून विजय प्राप्त करताच शिंदे सरकारचा हा पहिला विजय मानला जात आहे. आज भाजपा आणि शिंदे गटाला विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार असून त्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पक्षाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या बैठकीला मार्गदर्शन केले.
दरम्यान शिवसेनेचे नेते खा. अरविंद सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या व्हिपच्या विरुद्ध जाऊन शिंदे गटाला मतदान केल्याबद्दल “त्या ” ३९ आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना दिल्याचे सांगितले. दरम्यान हि घटनेची पायमल्ली असून त्याच्याविरुद्ध शिवसेना न्यायालयात धाव घेईल असेही त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra | 39 of our MLAs did not obey our whip, and didn't follow party order, so we have sought their disqualification from new Assembly speaker Rahul Narwekar. Shiv Sena chief Uddhav Thackeray has chosen Ajay Choudhari as the leader of the group: Shiv Sena MP Arvind Sawant pic.twitter.com/Z94MKv7q9b
— ANI (@ANI) July 3, 2022