Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MharashtraPoliticalUpdate : शनिवारी बहूमत चाचणीचे आदेश , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्य रात्रीच गोव्याकडे …

Spread the love

मुंबई : राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवार, २ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. आता नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंत्रालयात माँ  जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज , डॉ , बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून  प्रवेश केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी दि . २ व ३ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रीपद घेऊन शिंदे गोव्याकडे परतले …

दरम्यान आपल्या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एकनाथ शिंदे मध्यरात्रीच गोव्याकडे रवाना झाले. शिंदे गटाचे आमदार गोव्यातील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यांच्याशी विचार विनिमय करून शिंदे काल सकाळी एकटेच मुंबईत आले होते. पण जाताना  आपण मुख्यमंत्रीपद सोबत घेऊन जाऊ असा विचारही त्यांनी केला नव्हता असे म्हटले जात आहे.  आता शिंदे यांच्या गटाला २ आणि ३ जुलैला शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. सध्याचे त्यांचे संख्याबळ पाहता भाजपाचे १३०, शिंदे गटाचे ५० असे त्यांचे संख्याबळ आहे . आता उरलेले  शिवसेनेतील १६ आमदार काय करतील हे मात्र अद्याप उघड झालेले नाही. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गोव्यात थांबलेल्या आमदारांनी जल्लोष केला. यानंतर शिंदे आणि नंतर फडणवीसांनी या आमदारांशी संवाद साधला. आता हे आमदार मुंबईत येण्याच्या तयारीला लागले आहेत. या आमदारांना केंद्राची सुरक्षा देण्यात आली असून महाराष्ट्राचे पोलिसही बंदोबस्तात राहणार आहेत.

शिंदे – फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव …

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठीतून ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत तर फणवीस यांनी या दोधांचेही आभार मानले आहेत.

प्रारंभी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार नव्हते. मात्र, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक नाही, तर दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया …

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर, हा बाळासाहेबांच्या विराचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा विकास, सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले जाईल. सर्वांना सोबत, विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत. सर्वांच्या साथीनं विकासाचा गाडा पुढे नेण्याचे काम आम्ही करू, असेही ते म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती , ट्विटरवरून दिल्या  शुभेच्छा

उद्धव ठाकरेंना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. परंतु  ते एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला गेले नव्हते. दरम्यान महाविकास आघाडीच्या शपथविधीला तत्कालीन मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हजेरी लावली होती. परंतु  उद्धव ठाकरेंनी ट्विट करूनच शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि ,  “महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!”. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार  , काँग्रेसचे बाळासाहेब थोरात , खा. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यांच्याही ट्विटरवरून शुभेच्छा …

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या शुंभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या अशाही शुभेच्छा …

दरम्यान एकनाथ खडसे यांनीही नव्या सरकारला शुभेच्छा देताना म्हटले आहे कि ,  देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगले काम त्यांनी या ठिकाणी करावे. आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता यांनी करावी. घडलेले नाट्य हे अनअपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खूप मोठी अपेक्षा पूर्ण झाले नाही, परिस्थितीनुसार त्यांनी स्वीकारले, असे एकनाथ खडसे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात भाजप मित्र पक्ष म्हणून रिपाइंला स्थान द्यावे अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे.

 

राज ठाकरे यांच्या सावधपणे पावले टाकण्याच्या शुभेच्छा

संभाजी छत्रपती यांनीही नूतन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले असून राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासह मराठा समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावलं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान आपल्या ट्विटमुळे आणि धडाकेबाज वक्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे नेते खा, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ट्विटरवरून बोचरी टीका करताना म्हटले आहे कि , आम्ही तर दुःखी होतो , परंतु देवेन्द्र भाऊ आमच्यापेक्षा अधिक दुःखी आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!