Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अखेर मोदी सरकारकडून नोकर भरतीची घोषणा

Spread the love

नवी दिल्ली : निवडणूक प्रचाराच्या दरम्यान दार वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने अखेर विरोधकांच्या टीकेनंतर येत्या १८ महिन्यात १० लाख तरुणांसाठी नोकर भरती करण्याची घोषणा आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली आहे.


यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि ,  ‘पंतप्रधानांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनाच्या स्थितीचा आढावा घेतला असून, सरकारने पुढील 1.5 वर्षांत 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत.’ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संसदेत सांगितले होते की, 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. आता हीदेखील पदे भरण्यात येतील, अशी आशा आहे.

अशी आहे रिक्त पदांची आकडेवारी

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये सुमारे 15 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 2.3 लाख पदे रिक्त आहेत. संरक्षण (नागरी) विभागात सुमारे 6.33 लाख कर्मचाऱ्यांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सुमारे 2.5 लाख पदे रिक्त आहेत. पोस्ट विभागामध्ये एकूण मंजूर 2.67 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 90,000 जागा रिक्त आहेत, तर महसूल विभागात, 1.78 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 74,000 रिक्त पदे आहेत आणि गृह मंत्रालयात मंजूर 10.8 लाख पदांपैकी सुमारे 1.3 लाख पदे रिक्त आहेत.

काँग्रेस आणि एमआयएमकडून टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील दीड वर्षात 10 लाख तरुणांची भरती करण्याची घोषणा तरुणांमध्ये नवीन आशा आणि आत्मविश्वास आणेल. दरम्यान, पंतप्रधानांच्या घोषणेची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “बिली 900 उंदीर खाऊन हजला निघाली “, अशी टीका त्यांनी केली. 50 वर्षातील सर्वात वाईट रोजगार (दर) आपण अनुभवत आहोत, रुपयाचे मूल्य 75 वर्षातील सर्वात कमी आहे. पंतप्रधान कधीपर्यंत ‘ट्विटर ट्विटर’ खेळून आमचे लक्ष विचलित करणार आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान मोदी सरकारच्या या घोषणेनंतर विरोधी पक्ष काँग्रेससह एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी टीका केली आहे.“मोदी सरकारने मागील आठ वर्षात १६ कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या, त्याऐवजी आता २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून ५-५ लाख नोकऱ्या देण्याचे ते बोलत आहेत. केंद्र सरकारकडे ५५ लाख मंजूर पदं होती, पण ते फक्त १० लाख नोकऱ्या देत आहेत.” असं म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!