MaharshtraEducationUpdate : बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर …

मुंबई : दहावी आणि बारावी बोर्डाच्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल लवकरच लागतील अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी नुकतीच दिली होती. या घोषणेप्रमाणे उद्या दिनांक ८ जून रोजी दुपारी १ वाजता 12 वीचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या १२ वी नंतरच्या प्रवेशासाठी आपल्या गुणपत्रिकेची प्रत ऑनलाईन काढता येईल. याच गुणपत्रिकेवर प्रवेश नोंदवत येईल. मूळ गुणपत्रिका मिळण्यास मात्र थोडा विलंब लागणार आहे.
mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाईल अशी माहिती आहे.
विद्यार्थी पुढील वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात:
आपला निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल.
दरम्यान बारावीचे निकाल जाहीर करताना यंदा दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून त्यासाठी ३०:३०:४० असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण (३०%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३०%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (४० %) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.