Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सलमान खान -सलीम खान धमकी प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास 

Spread the love

मुंबई : पंजाबी गायक ‘सिद्धू मूसेवाला’ याच्या हत्येनंतर  बॉलिवूड अभिनेता ‘सलमान खान’ आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका चिट्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकीचे समजताच महाराष्ट्र सरकारकडून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या धमकीच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी दोन ज्याईंट सीपी क्राईम आणि कायदा सुव्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष पथक तयार करण्यात आले आहे.


दरम्यान मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील  यांनी सलमानशी संपर्क साधून त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला असल्याचे वृत्त आहे. रविवारी ५ जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना GB LB नावाने  सलमान खानला धमकीचे  पत्र आले होते . गोल्डी बरार आणि लॅारेन्स बिश्नोई यांचा यामागे हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. “सलीम खान सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा GB LB “, असा धमकीचा मजकूर असलेले  पत्र सलमानच्या बॉडीगार्डला मिळाले  होते . याआधी देखील अशाच स्वरुपाचे धमकीचे पत्र सलमान खानला मिळाले  होते .

पोलिसांकडून कसून तपास

या धमकीची माहिती मिळताच सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गुन्हे शाखेची  एक टिम तात्काळ तैनात  करण्यात आली आहे. दरम्यान ज्या ठिकाणी धमकीचे  पत्र मिळाले  त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राइम ब्राँचच्या टिमला सहकार्य करीत आहे. या प्रकरणी त्याने तत्काळ वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट आणि बँड स्टँड परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले आहे.

प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याची मागील आठवड्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने स्वीकारली. हा तोच लॉरेंस बिश्नोई आहे ज्याने  सलमानवर आधी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. सलमानच्या एका सिनेमाच्या शुटींगवेळी त्यानं सलमानच्या हत्येचा कट रचला होता. मात्र त्याचा कट फसला आणि त्याचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळेच आता सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

सलमानचे सध्या काय चालू आहे ?

आयफा अवॉर्ड्स २०२२ साठी अबू धाबीला गेलेला सलमान रविवारीच मुंबईला परतला. सलमान गेल्या काही महिन्यांपासून त्याचा आगामी चित्रपट टायगर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही भूमिका आहेत. एक था टायगर आणि टायगर जिंदा है चा थेट सीक्वल, हा चित्रपट शाहरुख खानच्या पठाणशी जोडला गेला आहे आणि त्यात शाहरुखचा एक कॅमिओ देखील आहे. हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!