Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaAccidentNewsUpdate : भाविकांची बस दरीत कोसळली , २२ जणांचा मृत्यू, ६ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये मोठा भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण जखमी झाले आहेत.  या बसमधून मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील २८ भाविक प्रवास करत होते. ही बस रविवारी (५ जून) उत्तरकाशी जिल्ह्यातील डामटाजवळ दरीत कोसळली. या दुर्घटनेत २२ भाविकांचा मृत्यू झाला. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरकाशीहून यमुनोत्रीला जात असताना यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर डामटाजवळ हा बस अपघात झाला. अपघातानंतर बचाव मोहिमेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्य केले.

Advertisements

दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करून आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!