Aurangabad Crime Update : औंगाबाद शहरात पुन्हा दोन खून एक निष्पन्न, दुसरा तपासावर

औरंगाबाद – रविवारी पहाटे हिमायत बाग परिसरातील डोंगर पायथ्याशी एक अर्धवट मृतदेह आढळला.तर सातारा परिसरातील राहूल नगरात चारित्र्यावर संशय घेत बायकोचा खून करणारा नवरा फरार झाला.वरील दोन्ही प्रकरणी बेगमपुरा आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत.
बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना डोंगरपायथ्याशी राहणार्या रहिवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर उघडकीस आल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले.
अर्धवट जळालेला मृतदेह, अनोळखी आहे.खुन नेमका केंव्हा झाला हे शवविच्छेदन झाल्यावरच समजेल असे पोतदार म्हणाले. तर सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहूल नगरात रात्री मच्छींद्र पिराजी पिटेकर(५०) याने बायकोच्या डोक्यात पाटा वरवंटा घालून खून केल्याचे मयताच्या मुलीने पोलिसांना सांगितले.
वरील दोन्ही घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार , सुरेंद्र माळाळे यांनी भेट दिली आहे. सातारा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत.
बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिमायत बाग शेजारी लच्छू पहिलवान यांच्या शेताजवळ डोंगराच्या पायथ्याला अनोळखी व्यक्तीचा मृत आढळला आहे. या व्यक्तीला डोक्यात धारदार शस्राने वार करून ठार मारण्यात आले असून, नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला हिमायत बाग परिसरात आणून त्याचा मृतदेह जाळण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लच्छू पहिलवान यांच्या शेतातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका व्यतीच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या आहेत. या व्यक्तीने खून केलेल्या इसमाला पांढऱ्या गोणीत व पोत्यात भरून गाडीवर ठेवून हिमायत बाग भागात आणल्याचे दिसत आहे. मात्र, अंधारामुळे त्या व्यक्तीचा चेहरा कॅमेऱ्यात नीट कैद न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड झाले आहे.
घटनास्थळी गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस उपायुक्त उज्वला वानकर, दिपक गिर्हे यांनी भेट दिली आहे.