Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : गोव्याच्या सहलीवरून परतणाऱ्या पर्यटकांची बस पेटली , ९ जणांचा होरपळून मृत्यू तर २० जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

गुलबर्गा – गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा नजिक झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचा चालक आणि क्लिनरला ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत मृताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार,  हैदराबादचे रहिवासी असलेले प्रवासी स्थानिक ऑरेंज या संस्थेच्या खाजगी बसने गेल्या दोन दिवसापूर्वी गोव्याच्या पर्यटनासाठी गेले होते. गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आज शुक्रवारी ते हैदराबादकडे निघाले होते. यावेळी गुलबर्गा शहराच्या बाहेरील सोलापूर -हैदराबाद राज्य महामार्गावर कमलापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरला बसने जोराची धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली.

Advertisements

बसमधून एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने २० प्रवासी गंभीर जखमी झाले तर उर्वरित नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जखमींना गुलबर्गा शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बसची आग आटोक्यात आणली. या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!