AurangabadCrimeUpdate : दोनवेगवेगळ्या गुन्ह्यात, ८ अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – नशेच्या गोळ्या बाळगणारे ५ तर तलवार बाळगणारे तीन असे एकूण ८आरोपी व ४ लाखांचा मुद्देमाल गून्हेशाखेने जप्त केला.या प्रकरणी बेगमपुरा, वाळूज औद्योगिक पोलिस ठाणे, जिन्सी आणि उस्मानपुरापोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गौतम लक्ष्मण त्रिभूवन(३०) रा.जोगेश्वरी, महेंद्र उर्फ पेंडी गौतम काळे(२२),निखील संजय चौतमल(१९) दोघेही रा.टाऊनहाॅल, सोहेलखान पिता खलीलखान(२४) रा.आसेफियाकाॅलनी,सद्दाम मुराद शेख(२७) रा.जलालकाॅलनी,अशी अटक आरोपींची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकल,व अंदाजे८हजार रु.च्या नशेच्या गोळ्या असा ऐवज जप्त करण्यात आला.वरील दोन्ही प्रकरणी बेगमपुरा आणि वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.तसेच वरील दोन्ही कारवाया मधे एन.डी.पी.एस. पथकाचा व अन्नऔषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सहभाग नोंदवला होता. तर असलम अहमदखान व आनद उत्तम सावंत आणि फईम गणी शेख या तिघांना तलवार बाळगल्या प्रकरणी जिन्सी आणि उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्याथ मुद्देमालासहित दिले.
वरील कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी काशिनाथ महांडुळे, एनडीपीएस चे सय्यद,पीएसआय अमोल म्हस्के, कल्याण शेळके, अजित दगडखैर यांनी पथकासहित भाग घेतला होता.