Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UPSCNewsUpdate : याला जिद्द ऐसे नाव !! , सात गोळ्या अंगावर झेलून व्यंगत्व आलेल्या रिकु राहीने मोठे यश ….

Spread the love

लखनौ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च परीक्षेत यश मिळविण्याचे  स्वप्न प्रत्येक तरुण पाहत असतो. यात अनेक जण अयशस्वी होतात तरीही आपली जिद्द सोडत नाहीत . असाच यशस्वितेचा इतिहास युपीच्या रिकु राही या तरुणाने रचला आहे. परवा लागलेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या निकालात आपले नाव ६८३ व्या स्थानावर कोरलेल्या तरुणाचे नाव आहे रिंकू राही हापूर. यूपीच्या समाजकल्याण विभागात ते अधिकारी आहेत. नाही नाही म्हणताना आपल्या शेवटच्या प्रयत्नात रिंकूने हे यश  मिळवले आहे.


कोण आहे रिंकू राही हापूर  ?

अलिगडच्या डोरी नगर येथील नागरिक रिंकू राही हापूर, यूपी येथे प्रांतीय नागरी सेवा अधिकारी आहेत. 2008 मध्ये मुझफ्फरनगरमध्ये 83 कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघड करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते राज्याच्या समाजकल्याण विभागात अधिकारी आहेत. या प्रकरणी आठ जणांवर आरोप ठेवण्यात आले असून चौघांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिंकूवर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या चेहऱ्यावरही  एक गोळी झाडण्यात आली, त्यामुळे त्याचा चेहरा विद्रूप झाला आणि त्यांची बघण्याची आणि ऐकण्याची क्षमता गेली.

आपल्या या यशाबद्दल रिंकू म्हणतात , या हल्ल्यात मला माझा एक डोळा गमवावा लागला. आपल्या नोकरीबरोबरच त्यांनी एका आयएएस कोचिंग सेंटरचे संचालक म्हणूनही अनेक वर्षांपासून नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या तरुणांना शिकवले आहे. या काळात “माझ्या विद्यार्थ्यांनी मला यूपीएससी परीक्षा देण्याचा आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहामुळे, प्रोत्साहनामुळेच मी हे  सध्या करू शकलो.”

रिंकूने सांगितले की, यापूर्वी 2004 मध्ये त्यांनी राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. अभ्यासासाठी वेळ काढणे अवघड होते, पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश संपादन करता आले. ते पुढे म्हणाले, ‘माझ्यासाठी जनहित महत्त्वाचे आहे, जेव्हा जेव्हा स्वार्थ आणि जनहिताचा संघर्ष होईल तेव्हा मी जनहिताची निवड करेन. रिंकू विवाहित असून त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा आहे, त्याला आता भविष्यातील हल्ल्यांपासून स्वतःला कसे वाचवायचे हे माहित आहे. शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणात माझ्याकडे पुरेसे पुरावे असल्याने हल्लेखोरांनी माझ्यावर गोळ्या झाडल्या मात्र मी न या हल्ल्याने न डगमगता त्यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवले. आपल्या या यशामुळे रिंकू , त्याचे कुटुंबीय , मित्र परिवार आणि कार्यालयातील कर्मचारी आनंद व्यक्त करीत आहेत.

AMU चा शब्बीर देखील IAS बनला…

AMU च्या रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमीत तयारी करणाऱ्या मोहम्मद शब्बीरने तिसर्‍या प्रयत्नात UPSC 419 वा रँकही मिळवला. मोहम्मद शब्बीर हा मूळचा जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील बन्सिया बाली गावचा रहिवासी आहे. शब्बीरने 2016 मध्ये एएमयूमधून बीएससी, 2018 मध्ये एमएससी केले. शब्बीरची 2020 मध्ये बीएसएफ असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली होती, पण तो रुजू झाला नाही. शब्बीरचे वडील शेती करतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!