Aurangabad Crime Update : ५५ हजारासाठी ज्योतिषाचे अपहरण, तिघांना बेड्या

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील देशमुख नगरातून जोतिषाला त्यांनी घेतलेले रुपये परंत करंत नसल्याच्या कारणावरुन तिघांनी हर्सूल मिटमिटा येथे नेत मारहाण केली.पण गुन्हे शाखेच्या पथकानेजोतिषासहित आरोपींना जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
या प्रकरणात शिवाजी किसन नवाथे(३२) रा.छावणी, मच्छींद्र आगलावे रा.बिडकीन, रवि हनुते रा.पदमपुरा अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालेली माहिती अशी आहे की, वैभव लहाने(२२) रा. शिवाजीनगर याच्या परिचयाचे किशोर कोंडेकर हे जोतिषी आहेत. ते जमीनीत सोने कुठे आहे ते दाखवतात.नोव्हेंबर २१मधे जोतिषी कोंडेकर यांनी आरोपींकडून जमीनीतील सोने दाखवतो असे सांगून ५५हजार रु.घेतले होते.पण कौंडेकर काही सोने दाखव नव्हते. म्हणून चिडलेल्या आरोपींनी दुपारी १२च्या सुमारास कोंडेकरांचे अपहरण करंत त्यांना हर्सूल परिसरात नेत हाताचापटाने मारहाण केली.
दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी वैभव लहाने याने गुन्हेशाखेकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पीएसआय अमोल म्हस्के यांना घटनाक्रमाचा शोध घेण्याचे आदेश दिले. मोबाईल लोकेशनवरुन गुन्हेशाखेने जोतिषी किशोर कौंडेकर व वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेत जवाहरनगर पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास पीएसआय वसंत शेळके करंत आहेत