AurangabadNewsUpdate : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी , एक ठार

औरंगाबाद – धुळे सोलापुर राष्र्टीय महामार्गावर वळदगाव जवळ आज पहाटे ४.३०च्या सुमारास ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एक इसम गंभीर जखमी झाला.त्याला उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डाॅक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या घटनेची सातारा पोलिसांनी नोंद घेतली आहे.
मूर्शरफ खुर्शीदखान (१८) रा.डकल्प ता. हातील जि.पालिहाल हरियाणा असे मयताचे नाव आहे.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता राजस्थान पासिंग चा ट्रक पलटी झालेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी गवांदे करंत आहेत.
ट्रॅक्टरच्या धडकेने पादचारी जखमी
आज रोजी 4 वाजण्याच्या सुमारास हर्सूल जळगाव रोडवर हर्सूल गावात इसम नामे साहिल शेख वय 19 रा आजोबा नगर वाळुंज हा रोड क्रॉस करत असताना ट्रॅक्टर क्र MH20 CR 6912 याने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला असून उपचार कामी घाटी येथे दाखल केले आहे.
उच्च दाबाच्या तारांना धक्का लागून बालक गंभीर
एकता नगर जटवाडा रोड येथे कडुबाई हिरामण जाधव यांच्या घराच्या गच्ची वर दोन लहान मुले नामे आदित्य सुरज वाकळे वय 9 वर्ष अदिती सुरज साबळे वय 6 वर्ष हे खेळत असताना घरावरून जाणाऱ्या हाय टेन्शन वायर ला कोणत्या तरी वस्तूचा धक्का लागल्याने स्फ़ोट झाल्याने यातील मुलगा नामे आदित्य गंभीर रित्या भाजला असून त्यास घाटी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. मुलगी अदिती किरकोळ जखमी झाली आहे.