Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या जिल्ह्यावर होणार ‘असनी’ चक्रीवादळाचा परिणाम

Spread the love

मुंबई : एकीकडे प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली असून दुसरीकडे पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘असनी’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाने आता आपला मार्ग बदलला असून आंध्रप्रदेशच्या  दिशेने वाटचाल केली आहे. हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान या ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागावर जाणवण्याची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिमाण जावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास असनी चक्रीवादळ हे काकीनाडा आणि विशाखापट्टनमच्या किनारपट्टीच्या भागात धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान वादळी वारे ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात, मुसळधार पाऊस पडू शकतो. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि यनम या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चक्रीवादळ वेगाने आंध्रप्रदेशच्या दिशेने कूच करत आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 12 मे पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!