MarathwadaNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोलीत शांतता मार्च

प्रभाकर नांगरे | हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात शांतता आणि सलोखा कायम राहावा यासाठी हिंगोली शहरातही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र आणि कामगार दिनी शांतता मार्च काढला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही राजकीय पक्ष,राजकीय संघटना यांच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण होईल या दृष्टीने भडकाऊ वक्तव्य करण्याचे प्रकार घडत आहेत…दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली पेटवयच्या आणि त्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजयची ही परंपरा पूर्वी पासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात चालत आली आहे…परंतु जातीयवादी दंगली घडवणाऱ्या पक्षाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचे कुटुंब किंवा मुले या मध्ये प्रत्यक्ष कधीही सहभागी नसतात…या मध्ये भरडला जातो तो सामान्य माणूस आणि प्रामुख्याने तरुण कार्यकर्ते….यामुळे अनेक तरुणाचे शैक्षणिक आणि सामजिक नुकसान झाल्याचे आपण आतापर्यंत बघत आलो आहोत….एकीकडे देशातील तरुण प्रचंड बेरोजगारी आणि महागाईने भरडला जात असताना येथील प्रस्थापित राजकीय पक्ष मात्र जाती जातीचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी या देशामध्ये,शांतता टिकून राहावी आणि या देशातील प्रत्येक धर्माचा माणूस एकमेकांसोबत प्रेमाने रहावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शांतता मार्च चे आयोजन करण्यात आले होते…हिंगोली शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 01मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता शांतता मार्च संविधान कॉर्नर येथून काढण्यात आला…. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक..खुराणा पेट्रोल पंप,जवाहर रोड,इंदिरा चौक,नांदेड नाका..येथून मार्च काढून गांधी चौक येथे भारताच्या संविधांचे प्रास्ताविक वाचून समारोप करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,महिला आघाडीचे पदाधिकारी,युवक आघाडी,विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.