AurangabadCrimeUpdate : मिटमिट्याच्या मच्छींद्रनाथ मंदीरात चोरी, नितीन गडकरींनी घेतली दखल

औरंगाबाद : मिटमिटा येथील मच्छींद्रनाथ मंदीरात आज पहाटे ३च्या सुमारास सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरील सोन्याचांदीचे आभूषण व ४ हजार रु.रोख असा ऐवज चोरीला गेला. गुन्हा दाखल होताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मंदीराचे विश्र्वस्त माधव रत्नपारखी यांच्याशी संवाद साधला अशी माहिती नितीन गडकरींनी ‘महानायक ‘ शी बोलतांना दिली.
मच्छींद्रनाथ मंदीराचे प्रमुख माधव रत्नपारखी हे नितीन गडकरींचे अध्यात्मिक गुरु आहेत.या प्रकरणात ३८ हजार ९८८ रु.च्या चांदीच्या १६ बांगड्या,२२हजारांचा चांदीचा मुकुट व ४ हजार रु.रोख असा ऐवज आहे. या प्रकरणी वेंदात रत्नपारखी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोरे करंत आहेत.