Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : राजकारण : खा. राणा नवनीत यांच्या पत्रावर लोकसभा सचिवालयाने मागितला तत्काळ खुलासा…

Spread the love

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आ. रवि  राणा चांगलेच कायदेशीर कचाट्यात अडकले आहेत. मात्र शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करण्याचा मी प्रयत्न केल्याचे नवनीत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तर सरकारचा विरोध राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणाला नाही तर त्यांनी हे पठाण रस्त्यावर किंवा मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच  पठण करण्याचे खुले आव्हान देऊन राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याचे सरकारच्या वतीने न्यायालयासमोर सांगण्यात आले. 

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी हनुमान चालिसाच्या पठणाची घोषणा करून सरकारला खुले आव्हान देत मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यामुळे शिवसैनिकांनी एकच गोंधळ घातला. यानंतर मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करून तुरुंगात पाठवले. आता नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून उद्धव सरकार , महाराष्ट्र पोलिस आणि तुरुंग प्रशासनावरही अनेक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे  लोकसभा सचिवालयानेही  याबाबत महाराष्ट्र सरकारकडून २४ तासांत अहवाल मागवला आहे.

मी अनुसूचित जातीची असल्याने तुरुंगात माझ्याशी भेदभाव

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.  नवनीत राणा यांनी पत्रात लिहिले की, मला २३ तारखेला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. २३ एप्रिलला मला संपूर्ण रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागली. रात्री अनेकवेळा पाणी मागितले, पण रात्रभर पाणी दिले नाही. नवनीतने पुढे मोठा आरोप केला आणि सांगितले की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे ते ज्या ग्लासात पितात त्याच ग्लासात ते मला पाणी देऊ शकत नाहीत. म्हणजे माझ्या जातीमुळे मला प्यायलाही पाणी दिले गेले नाही. मला हे आवर्जून सांगायचे आहे की माझ्या जातीमुळे मला मूलभूत मानवी हक्क नाकारले गेले आहेत.

खालच्या जातीची जातीतील लोकांना बाथरूम वापरू देत नाहीत म्हणाले …

नवनीत राणा यांनी पुढे म्हटले आहे कि ,  मला रात्री बाथरूममध्ये जावे  लागले , पण पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागणीकडे लक्ष दिले  नाही. त्यानंतर माझ्यावर अत्याचार झाला. ते (पोलीस कर्मचारी) खालच्या जातीतील लोकांना बाथरूम वापरू देत नाहीत, असे सांगण्यात आले. नवनीत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरकार हिंदुत्वाच्या तत्त्वांपासून पूर्णपणे विचलित झाले आहे. ज्याच्या जोरावर ते सत्तेत आले ते लोकांचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करण्याचा मी प्रयत्न केल्याचे नवनीत यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाच्या पठणाची घोषणा करण्यात आली. हे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी किंवा तणाव निर्माण करण्यासाठी केलेले नाही.

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसाच्या पठणासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. माझे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हते. पण माझ्या या कारवाईमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा आरोप माझ्यावर करण्यात आला. यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचेही सांगितले.

नवनीत राणा यांच्यावर कोणती कलमे लावण्यात आली?

कलम 153A म्हणजेच धर्माच्या आधारे दोन गटांमध्ये वैर वाढवल्याबद्दल पोलिसांनी खासदार नवनीत आणि रवी राणा यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध कलम 353 अन्वये आणखी एक गुन्हा दाखल केला. त्यानंतर रविवारी वांद्रे न्यायालयात फिर्यादी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली होती, ती फेटाळण्यात आली. यानंतर राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचे कलमही लावण्यात आले आहे.

या वादावर महाराष्ट्र सरकार काय म्हणाले?

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नवनीत राणा यांना हनुमान चालीसा वाचल्याबद्दल अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे अटक करण्यात आली आहे. वळसे पाटील म्हणाले, ‘नवनीत राणा दाम्पत्य जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करत होते. त्यांचा हनुमान चालीसा वाचण्यास कोणताही विरोध नव्हता. पण दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांना  असे  का करायचे  होते ? स्वतःच्या घरात वाचा. परंतु अशी घोषणा करीन त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेत अडचण निर्माण केली, म्हणून त्यांना अटक करण्यात आली.

शिवसनिकांचे म्हणणे असे आहे …

राणा दाम्पत्याने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ घराबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्याच्या या घोषणेनंतर शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर जमले होते. राणे दाम्पत्याच्या घराबाहेर त्यांनी दिवसभर गोंधळ घातला. राणे दाम्पत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत शिवसैनिकांनी मातोश्री हे त्यांच्यासाठी मंदिरासारखे असल्याचे म्हटले होते. राणा दाम्पत्याने भावना दुखावल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!