Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेल्वेतून महिलेच्या गळ्यातील दोन लाखाच्या सोनसाखळीची चोरी

Spread the love

औरंगाबाद : रेल्वेच्या ग्रीन सिग्नलला कागद चिकटवून रेल्वेवर दगड फेक करंत खिडकी बंद करणार्‍या महिलेची २ लाख रु.ची सोन्याची चैन हिसकावल्या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात पहाटे पावणे दोन वा.जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.तो औरंगाबाद रेल्वे पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला असल्याची  माहिती पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली.

लक्ष्मी प्रभाकर रा.मुंबई असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे.निजामाबाद ते मुंबई प्रवास करत असतांना पोटूळ रेल्वे स्थानकाआधि पहाटे १२.१५वा.रेल्वेला ग्रीन सिग्नल न मिळाल्यामुळे रेल्वेचालकाने रेल्वे थांबवली. कारण देवगिरी एक्सप्रेसला पोटूळ रेल्वेस्थानकावर थांबा नसतांना ग्रीन सिग्नल मिळाला नाही.त्यामुळे रेल्वे थांबवावी लागल्याचे रेल्वेचालकाने पोलिसांना सांगितले.दरम्यान रेल्वेवर दगड फेकून मारल्यामुळे प्रवासी लक्ष्मी प्रभाकर या खिडकीची काच लावत असतांना त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅ. वजनाची २लाख रु. ची सोन्याची चैन चोरट्याने हिसकावली.या नंतर पहाटे पावणे दोन वा. रेल्वे मनमाडला पोहोचल्यानंतर या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा मनमाड रेल्वे पोलिसांकडे दाखल झाला.तो औरंगाबाद रेल्वे पोलिसांकडे वर्ग झाला असून पुढील तपास एपीआय साहेबराव कांबळे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!