AurangabadNewsUpdate : गर्भवती विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांना बेड्या

औरंगाबाद -गर्भवतीने आत्महत्या केल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी नवरा, दीर आणि नणंदेला अटक केली अशी माहिती पोलिस निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली. नवरा विशाल रिडलान,दीर विकी आणि नंणंद रिना सर्व रा.गांधीनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.तर आंचल विशाल रिडलान असे मयत गर्भवतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०२०साली नांदेड येथील आचल हटवाल चे लग्न आरोपी विशाल रिडलान सोबंत झाले होते, विशाल चा वराह पालन आणि स्वच्छतेचे ठेके घेण्याचा व्यवसाय आहे. लग्नानंतर आचल चा सासरी शारिरीक व मानसिक छळ होत असे. सोमवारी विशाल आणि त्याच्या आईने लाथाबुक्याने मारहाण केल्याची माहिती आचलने फोन करुन माहेरी सांगितली होती.त्यामुळे असह्य झालेल्या त्रासामुळे आचल ने सोमवारी रात्री गळफास घेतला.हा प्रकार सासरच्यांनी पाहिल्याने त्यांनी आचलला घाटीत उपचारासाठी दाखल केले. पण डाॅक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.आचल च्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.
कोटक जनरल इन्शूरन्स : आरोपींचा अटक पूर्व जामिन फेटाळला.
औरंगाबाद- चिकलठाणा येथील मेल्र्टोन सेंटर मधे ७ जून २१ ते १ जाने.२२ या काळात कोव्हिड चे उपचार घेतल्याचे बोगस डिस्चार्ज कार्ड तयार करवून त्यावर कोटक जनरल इन्शूरन्स कडून क्लेम हडपणार्या ९ आरोपींपैकी तिघांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.या मधे आसित वाघ, इंदल राजपूत आणि शुभांगी राजपूत यांचा समावेश आहे.तर अन्य सहा जणांचे अटकपूर्व जामिन अर्ज प्रलंबित असल्याची माहिती सिडको औद्योगिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , २८ मार्च २२रोजी या प्रकरणी मुंबई भायखळा येथील कोटक इन्शूरन्स चे पश्र्चिम विभागाचे व्यवस्थापक जहीरखान अजगर खान यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा बाखल झाला होता.या प्रकरणात एकूण ९आरोपी असून १) असित जगदीश वाघ,२)अमोल रानसिंग,३)शिवानी शिरीष मुळे,४)शुभांगी भरतसिंग राजपूत ५)किशन गुर्जर,६) गणेश कडू७) इंदल राजपूत८)ईम्रान मुश्ताक शेख९)प्रविण पवार यांचा समावेश आहे. यातील आरोपी क्र १ते सहा यांनी कोव्हिडचे उपचार घेतल्याचे बोगस डिस्चार्ज कार्ड तयार करवून अपहार केला. तर आरोपी ७ते ९यांनी बोगस डिस्चार्ज कार्ड तयार करवून अपहारासाठी प्रकरण कोटक इन्शूरन्स कडे दाखल केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.हा गुन्हा अजामिनपात्र असल्यामुळे आरोपींचे अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाकडून फेटाळले जात आहेत.या प्रकरणी आरोपींचारिमांड घेण्याची प्रक्रिया सुरुअसल्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले. तसेच अपहाराची ही कल्पना कोणाची आहे. कोटक बॅंक आनि महापालिकेचे कोणते अधिकारी या मधे सामिल आहेत याचा पोलिस तपास करंत असल्याचे सूत्रांनी सांगितले.