GunratnaSadavarteNewsUpdate : मुंबईसह सहा जिल्ह्यात सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हे , न्यायालयात चालू आहे जामिनावर सुनावणी

मुंबई : सातारा पोलिसनाकडून सुटका झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या सुपूर्द केले असून आता त्यांच्या अटकेसाठी अकोट , कोल्हापूर पोलीस सक्रिय झाले असले तरी सदावर्ते यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर न्यायालयात सुनावणी चालू असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर अॅड. सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांना ताब्यात घेत अटक केली होती. यानंतर सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रयत्नशील आहेत. मात्र तत्पूर्वी सदावर्तेंनी अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. दरम्यान छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आणखी एक गुन्हा साद्वार्ते यांच्याविरुद्ध कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबई, सातारा, कोल्हापूर व्यतिरिक्त सदावर्ते यांच्यावर पुणे, बीड, अकोट या ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.