Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : राज ठाकरे यांची भाषा गुंडगिरीची आणि संविधान विरोधी, रिपाइं त्यांच्या दादागिरीचे उत्तर देईल : रामदास आठवले

Spread the love

गोंदिया : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा गुंडागिरीची असून त्यांचे वक्तव्य संविधानविरोधी असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा  रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले  यांनी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना समर्थन देणे राजकीय पातळीवर भाजपाला महागात पडेल, अशी स्पष्टोक्तीही रामदास आठवले यांनी केली आहे. 

गोंदियामध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे. या सभेत बोलताना आठवले म्हणाले कि ,  ‘आपला रिपाई पक्ष राज ठाकरे यांना समर्थन करीत नाही. राज ठाकरे यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांचे मत  बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या विरुद्ध आहे. संविधानाने सर्वांना सर्वधर्म समभावचा नारा दिला आहे. जर राज ठाकरे असेच संविधान विरोधी वक्तव्य करत दादागिरी करत असेल तर रिपाई आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही आठवलेंनी दिला. तसंच, मनसेची भूमिका ही अतिघाईच असून ही हार्ड भूमिका घेऊन भाजपाला काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना समर्थन देणे राजकीय पातळी वर भाजपाला महागात पडेल, असा इशाराही रामदास आठवले यांनी भाजपला दिला.

‘भाजप आणि मनसे ची युती होऊच शकत नाही, रिपाई पक्ष भाजप सोबत असतांना त्यांना मनसेची गरज नाही. बाबासाहेबांना मानणारा हा रिपाई पक्षसोबत असतांना भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, असंही आठवले म्हणाले. राज ठाकरे यांनी अयोध्येला खुशाल जावे, मात्र त्यांना आता पर्यंत अयोध्या का आठवली नाही.मनसेने  खाली हात अयोध्येला जाऊ नये, राम मंदिर बांधण्यास काही तरी घेऊन जावे , असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना थेट महाविकास आघाडी सोडण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसवर अत्याचार होत आहे. त्यामुळे काँग्रेसवर होत असलेल्या अत्याचार लक्षात घेता नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि त्यांनी आमच्या सोबत यावे, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना दिली आहे.

‘सध्या नाना पटोले हे डॅशिंग नेते आहेत. त्यांच्या काँग्रेस पक्षाला पाहिजे, तसे महत्त्व महाविकास आघाडी सरकारमध्ये मिळत नाही. त्यांमुळे नाना पटोले यांनी सोनिया गांधी यांच्याशी बोलून सरकारमधून पाठिंबा काढावा, असे आवाहन करत आमचे नम्र निवेदन असल्याचे खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!