Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : धक्कादायक : खिचडीत मीठ जास्त झाले म्हणून पतीने घोटला पत्नीचा गळा … !!

Advertisements
Advertisements
Spread the love

ठाणे : जेवणात जास्त मीठ टाकल्याने चिडलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. पोलिसांकडून सांगण्यात आले की, शुक्रवारी सकाळी भाईंदर पूर्वेतील फाटक रोड परिसरात एका व्यक्तीने न्याहारीसाठी तयार केलेल्या खिचडीमध्ये जास्त मीठ टाकल्याने पत्नीचा खून केला असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांना नीलेश घाघ नावाच्या ४६ वर्षीय व्यक्तीने सकाळी ९.३० वाजता पत्नी निर्मला हिचा गळा दाबून खून केल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच, भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

दुसरीही एक हृदयद्रावक घटना , सुनेची गोळी झाडून हत्या

गुरूवारी अशाच प्रकारची घटना घडली असून, चहासोबत नाश्ता वेळेवर न दिल्याने संतापलेल्या सासरच्या मंडळींनी सुनेची गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, राबोडी भागातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय महिलेच्या पोटात गोळी लागली आणि शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!